COVID-19 : आता रेल्वेचे डब्बे बनणार ‘कोरोना’ आयसोलेशन सेंटर, 20 हजार कोच केले जात आहेत ‘सॅनेटाईज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी देशभरात 21 दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, तरीही कोरोना नियंत्रित होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी सरकार नवीन पद्धती अवलंबण्याचा विचार करीत आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकार मोठा निर्णय घेत आता रेल्वेच्या बोगींना कोरोना आयसोलेशन सेंटर बनविण्याबाबत विचार करीत आहे. भारतीय रेल्वेकडे सध्या 50 ते 60 हजार कोच आहेत. परंतु सध्या केवळ 20 हजार कोचला आयसोलेशन केंद्रे बनविण्याची चर्चा आहे. हे पाऊल देखील उचलले जात आहे कारण, सध्या लॉकडाऊनमुळे सर्व गाड्या उभ्या आहेत.

रेल्वेच्या सर्व डब्यांना केले जात आहे सॅनिटाईज
रेल्वे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 20 हजार डब्यांना आयसोलेशन सेंटर बनविण्याबाबत विचार केला जात आहे. गरज भासल्यास कोरोनाचे रुग्ण या कोचमध्ये ठेवण्यात येतील. त्यासाठी हे हजारो डबे स्वच्छ करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी हजारो अज्ञात प्रवाश्यांनी त्यांच्यात प्रवास केला आहे. त्यापैकी कोण कोरोनाला संक्रमित होता, कोण आजारी होता याची माहिती नाही. हे पाहता या डब्यांना सॅनिटाईज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डब्यांना सॅनिटाईज केल्यानंतर सर्व गाड्या आरपीएफच्या देखरेखीखाली देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या डीआरडीओच्या प्रयोगशाळेतही सॅनिटायजर बनविले जात आहे. आतापर्यंत 20 हजार लिटर सॅनिटायजर बनविण्यात आले आहे. त्यापैकी 10 हजार लिटर सॅनिटायजर दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. उर्वरित सर्व इतर सरकारी संस्थांना देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की डीआरडीओने दिल्ली पोलिसांना 10 हजार मास्क पुरवले आहेत.

बॉडी सूटही बनवित आहे डीआरडीओ
कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझर बनविण्याव्यतिरिक्त, डीआरडीओच्या इतर संस्था बॉडी सूटसारखे वैयक्तिक संरक्षण उपकरणेदेखील बनवण्यावर काम करत आहेत. जास्तीत जास्त उत्पादनाकडे लक्ष दिले जात आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, आमचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र या कामात गुंतले आहेत. ऑर्डिनेन्स फॅक्टरी बोर्ड सॅनिटायझर, मास्क आणि बॉडी सूटही बनवित आहे. त्याचबरोबर, व्हेंटिलेटर बनविण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड एक पाऊल पुढे टाकत आहे.