‘ड्यूटीवर आहात शिव्या नका देऊ’, मी पण 30 दिवसांपासून घरच्यांचं तोंड नाही पाहिलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पोलिसांच्या नोकरीला अडीच वर्षे झाली, इतका कठीण काळ यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. दुःख तेव्हा होते जेव्हा लोकांना समजत नाही आणि ते आम्हालाच शिव्या देतात किंवा दगडफेक करतात.’ नोएडा सेक्टर २० पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून तैनात उषा कुशवाहा यांना लॉकडाऊन ड्युटीबद्दल विचारले असता त्या बोलत होत्या.

कडक उन्हात तोंडाला मास्क लावून रस्त्यावर ड्युटी करत असलेल्या उषा कुशवाहा यांना आपल्या सात सदस्यांच्या कुटुंबाची रोज आठवण येते. उषा सांगतात की माझे घर गाझियाबादमध्ये आहे. पोलिस स्टेशनमधून घरी जायला एक तासही लागत नाही. कुटुंबात माझ्या आई-वडिलांव्यतिरिक्त, माझे दोन भाऊ-वहिनी आणि बहिणी सगळे आहेत. असे पहिले कधी झाले नाही कि मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना दोन आठवड्यांत कधी भेटले नाही. आता मात्र एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे, मी त्या सर्वांचा चेहरासुद्धा पाहिलेला नाही. मी येथे पोलिस ठाण्यात खोली घेऊन राहत आहे. येथे मी माझे जेवण ते युनिफॉर्म धुणे सगळी काम स्वतःच करते. आता कुठूनही सर्व्हिस मिळत नाही, त्यात पूर्ण ड्युटी देखील आहे.

Advt.

उषा म्हणाली की घरातील सदस्य यायला सांगत आहेत, परंतु मी त्यांना भेटण्यासाठी जात नाहीये. मला भीती वाटते की माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील कोणीही धोक्यात येऊ नये. म्हणूनच मी एकटीच राहत आहे. जेव्हा लोक विनाकारण लॉकडाऊन तोडतात किंवा आमच्याशी गैरवर्तन करतात तेव्हा दुःख होते.

मार्च महिन्यात लॉकडाऊन असताना त्याच वेळी जवळच्या झोपडपट्टीसाठी रेशन वाटण्यासाठी पोलिस ठाण्यात आले. या भागाच्या सभोवताली मोठ्या संख्येने झोपडपट्ट्या आहेत, म्हणून येथे महिलांची गर्दी देखील खूप होती. जेव्हा रेशन संपले तेव्हा ज्या महिलांना ते मिळाले नाही त्यांनी आमच्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. त्या शिव्या देऊ लागल्या. मोठ्या कष्टाने फोर्सला बोलावून त्यांच्यावर नियंत्रण आणले.

उषा सांगते की ही एकमेव घटना नाही, मी अनेकदा पाहिले आहे की लॉकडाऊन तोडण्याशिवाय पोलिसांशी भांडण्याचा प्रयत्न करतात. त्या लोकांनी विचार केला पाहिजे की आम्ही जे काही करत आहोत ते जनतेच्या संरक्षणासाठी आणि आमच्या ड्युटीमुळे करत आहोत.