Coronavirus : कोरोनाचा हाहाकार ! अमरावतीमध्ये 110 गावं केली सील

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने कहर केला असून, अनेक बाधितांची संख्या वाढत आहे. यंदाची दुसरी लाट लोकांना अधिक त्रास करत आहे. तर शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाने अधिक हाहाकार केला आहे. या कोरोना विषाणूने अमरावती जिल्हयात अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एक धक्कादायक बाब म्हणजे सध्या अमरावती जिल्हयात जवळपास ११० गावे सील केली आहे.

कोरोनाचा कहर रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील हॉटस्पॉट असणारी ११० गावे सील करण्यात आली आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश लगतच्या सर्व बॉर्डर सील करण्यात आलेल्या आहेत. सोबतच धारणी तालुक्यातील १० गावे देखील सील केली गेल्याची माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली आहे. धारणी तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन कोव्हीड टेस्ट अभियान मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, धारणी तालुक्यात आज २८३ नवे रुग्ण आहेत. या दरम्यान, जिल्ह्यात आजअखेर ग्रामीण भागात एकूण ३१ हजार ४१३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर त्यापैकी ५२१ कोरोना रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्यात ११२३ कोरोना बाधित रुग्णाची नवी नोंद झाली आहे.

या दरम्यान, तिवसा तालुक्यातील तिवसा शहर आणि ग्रामीण भागातील १० गावे सील केली आहे. तिवसा तालुक्यात बाजार आणि किराणा दुकान देखील बंद केली आहे. अशी माहिती तिवसा तहसीलदार वैभव फडतारे यांनी दिलीय. तर यशोमती ठाकूर ह्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत तर तिवसा तालुका हा त्यांचा मतदार संघ आहे. त्या तालुक्यात १५० कोरोना ग्रस्तांची नोंद झाली आहे.