Corona Medicine : DRDO च्या अँटी कोरोना औषध 2DG चे 10 हजार डोस लाँच, जाणून घ्या रूग्णांवर कसे करणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आज संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बनवलेले अँटी कोरोना औषध 2-डीजी चा पहिला साठा लाँच झाला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाभ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ते लाँच केले. मार्केटमध्ये येताच औषध एक-दोन दिवसानंतर रूग्णांना मिळण्यास सुरूवात होईल. रिपोर्टनुसार, कोरोना औषध 2डीजीचे पहिले 10 हजार डोस हैद्राबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅबमध्ये तयार केले आहेत.

राजनाथ सिंह यांनी सांगितले 2डीजी औषधाचे वैशिष्ट्य

या औषधाबाबत संरक्षण मंत्री राजनाभ सिंह यांनी म्हटले, आशा आहे की, हे औषध आशेचा नवीन किरण ठरेल. मला सांगण्यात आले की, याच्या वापराने सामान्य उपचाराच्या तुलनेत लोक अडीच दिवस लवकर बरे होतील. सोबतच ऑक्सीजनवरील अवलंबत्व सुमारे 40 टक्केपर्यंत कमी होईल. हे पावडर फॉर्ममध्ये असणे सुद्धा याचे खास वैशिष्ट्य आहे. हे ओआरएस मिश्रणासारखे वापरणे सोपे जाईल.

कोरोनाचे 2डीजी औषध शरीरात कसे काम करते

जेव्हा हे औषध 2-डीजी रूग्णाच्या शरीरात जाते तेव्हा ते व्हायरसद्वारे संक्रमित पेशींमध्ये जमा होते. ज्यानंतर हे ड्रग व्हायरस सिंथेसिस आणि एनर्जी प्रॉडक्शन करून संसर्गाला वाढण्यापासून रोखते.

पाण्यात मिसळून प्यावे लागेल हे अँटी कोविड ड्रग

मंत्रालयाने म्हटले होते की, सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या संख्येने रूग्णांना गंभीर ऑक्सीजन अवलंबत्वाचा सामना करावा लागत आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता आहे. हे औषध संक्रमित पेशींवर परिणामकारक आहे, यासाठी या औषधाच्या वापराने रूग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता असणार नाही. हे औषध पावडरच्या रूपात एका पॅकेट म्हणजे सॅशेमध्ये येईल. जे रूग्णांना पाण्यात मिसळून प्यावे लागेल.