Corona Medicine : DRDO चे अँटी कोरोना औषध 2DG चे 10 हजार डोस तयार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार आज लाँच

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुरू असतानाच आज सोमवारी (17 मे) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) कडून तयार करण्यात आलेले अँटी कोरोना औषध 2-डीजी चा पहिला साठा आज बाजारात लाँच होणार आहे. डीआरडीओच्या या अँटी कोरोना औषधाचे 10 हजार डोस तयार आहेत, जे आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन सकाळी 10.30 वाजता लाँच करतील. मार्केटमध्ये येताच हे औषध एक-दोन दिवसात कोरोना रूग्णांना मिळू लागेल. हे दहा हजार डोस हैद्राबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅबमध्ये तयार झाले आहेत.

डीआरडीओच्या अधिकार्‍यांनी म्हटले की, दोन्ही मंत्री राजनाथ सिंह आणि हर्षवर्धन हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात औषधाचा पहिला साठा लाँच करतील.

संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते की, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) ने डीआरडीओने बनवलेल्या या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे.

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) मधून समजले आहे की हे हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्णांना वेगाने रिकव्हर होण्यास मदत करते. याशिवाय औषध रूग्णांना ऑक्सीजन आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता सुद्धा कमी करते. हे औषध कोरोनाच्या सामान्य रूग्णांना सुद्धा देत येऊ शकते. हे औषध पावडरच्या रूपात एक पॅकेट म्हणजे सॅशेमध्ये येईल. जे रूग्णांनी पाण्यात मिसळून प्यायचे आहे.