Corona New Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, मुंबई – पुण्यासह ‘या’ 14 जिल्ह्यांना मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक (Restrictive) बंधने शिथिल (Restrictions Relaxed) करत नवी नियमावली जाहीर (Corona New Guidelines) करत राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारची (State Government) नवी नियमावली (Corona New Guidelines) 4 मार्च पासून लागू केली जाणार आहे, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील 14 जिल्ह्यांमधील नाट्यगृहे (Theaters), सिनेमागृहे (Cinemas), पर्यटन स्थळे (Tourist Spots) आणि धार्मिक स्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मात्र मनोरंजन स्थळे आणि पर्यटन तसेच धार्मिक स्थळे 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.

 

राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार (Corona New Guidelines), लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या सभागृहातील एकूण क्षमतेच्या 50 एवढी परवानगी देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालये मात्र पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहेत. तसेच लसीचे (vaccine) दोन डोस पूर्ण झालेल्यांना आंतरराज्यीय प्रवासाची (Interstate Travel) मुभा देण्यात आली आहे. याशिवाय सरकारने ऑफलाइन शाळा देखील सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

हे आहेत 14 जिल्हे

1. मुंबई शहर (Mumbai City)

2. मुंबई उपनगर (Mumbai Suburbs)

3. पुणे (Pune)

4. भंडारा (Bhandara)

5. सिंधुदुर्ग (Sindhudurg)

6. रत्नागिरी (Ratnagiri)

7. रायगड (Raigad)

8. नागपूर (Nagpur)

9. वर्धा (Wardha)

10. सातारा (Satara)

11. सांगली (Sangli)

12. गोंदिया (Gondia)

13. चंद्रपूर (Chandrapur)

14. कोल्हापूर (Kolhapur)

 

Web Title :- Corona New Guidelines | maharashtra government issues new guidelines for corona theaters cinemas restaurants tourist spots and religious places in 14 districts at 100 per cent capacity

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा