दिलासादायक ! 3 राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, आरोग्य मंत्रालयाची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशातच देशासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशातील अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि लक्षद्वीप आदी 3 राज्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या राष्ट्रीय दरातही घसरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 4 लाख 3 हजार 738 नवे रुग्ण आढळले आहेत. यात देशातील 10 राज्यांमध्ये सर्वाधिक 71.75 टक्के इतके रुग्ण आहेत. यात महाराष्ट्रात सर्वाधिक 56 हजार 578 रुग्ण आढळले. तर कर्नाटकात 47 हजार 563 रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये 41 हजार 971 नवे रुग्ण वाढले आहेत. देशात आतापर्यंत 30 कोटी 22 लाख चाचण्या झाला आहेत. तर दैनंदिन कोरोना संसर्गाचे प्रमाण 21.64 टक्के इतके नोंदवले आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 37 लाख 36 हजार 648 इतकी झाली आहे. देशाच्या मृत्यूदरात घट होऊन सध्याच्या मृत्यूदर 1.09 टक्के इतका नोंदवला आहे. देशात गेल्या 24 तासात 4 092 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 74 टक्के रुग्णांचा मृत्यू देशातील 10 राज्यांत झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 864 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कर्नाटकात 484 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 16 कोटी 94 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांमध्ये 17 लाख 84 हजार 869 जणांचे लसीकरण झाले आहे.