नीरेच्या ‘कोरोना’ योद्धा डॉक्टराची मुुंबईत COVID-19 वर मात, पुन्हा सेवेसाठी झाले सज्ज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नीरा (ता.पुरंदर) येथील रहिवाशी असलेले कोरोणायोद्धा डॉ. सौरभ मंदकनल्ली हे मुंबईतील हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करताना कोरोना बाधीत झाले आणि कोरोणनावर मात करून पुन्हा कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करण्यास सज्ज झाले आहेत.

नीरा ( ता.पुरंदर ) येथील प्रख्यात डॉ. लिलाधर मंदकनल्ली यांचे सुपुत्र डॉ. सौरभ लिलाधर मंदकनल्ली यांनी मुंबईमध्ये एम.एम.बी.एस.चे शिक्षण

पुर्ण करून जुहू मधील कूपर हॉस्पिटल मध्ये इंटरशीप करीत आहे. यादरम्यान जगासह, देशात, राज्यात व मुंबई , पुणे सारख्या शहरात कोरोणा संसर्गाचा वेगाने पसार झाला. त्यामुळे कोरोणाला हरविण्यासाठी वैद्यकिय यंत्रणेपुढे मोठे आव्हाण उभे राहिले. राज्यातील सर्वच वैद्यकिय यंत्रणेसह प्रशासन अलर्ट झाले. अशा प्रसंगात डॉ. सौरभ मंदकनल्ली यांनी ही मागे न राहता गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करू लागले. या दरम्यान २३ जुन रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. तेंव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ते उपचार घेेेत होते. या दरम्यान तरुण डॉक्टर असलेल्या डॉ. सौरभ मंदकनल्ली यांनी मोठ्या धैर्याने कोरोणाला हरवून त्यांंना २ जुलै रोजी हाँस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आहे.

यावर न थांबता डॉ. सौरभ पुन्हा जुहू मधील कूपर हॉस्पिटलमध्ये कोरोणाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यास सज्ज झाल्याने राज्यातील डॉक्टरांंपुुढेे आदर्श निर्माण केला आहे. त्यामुुुुळे त्यांचे नीरा व परिसरात कौतुक होत आहे.