Corona News | कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? WHO चे प्रमुख म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – corona news |कोरोनाच्या मोठया प्रभावानंतर सध्या काही देश कोरोनाच्या विळख्यातून सुटू लागला आहे. मात्र काही देशात कोरोनाची परिस्थिती अद्यापही बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांनी माहिती दिली आहे. एकीकडे काही देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona vaccine) वेग वाढला असताना अनेक देशात लसींचा (Corona vaccine) भयंकर तुटवडा निर्माण झालाय. अशातच नवीन आलेला डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) 111 देशात डोकं वर काढलं आहे. यावरून कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार? या पार्श्वभूमीवर WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस (Dr. Tedros) यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

Pension Slip | पेंशनधारकांना मोठा दिलासा ! आता WhatsApp च्याद्वारे सुद्धा मिळू शकते पेन्शन स्लिप

काय म्हणाले डॉ. टेड्रॉस?

WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस (Dr. Tedros) यांनी सांगितलं आहे की, ‘दुर्दैवाने आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत, तसेच, “Delta व्हेरिएंटचा वेगाने होणारा प्रसार, अनेक देशात अनेक ठिकाणी पुन्हा होऊ लागलेली गर्दी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा योग्य प्रकारे प्रभावीपणे न होणारा वापर या गोष्टी करोनाचे रुग्ण आणि करोनामुळे होणारे मृत्यू पुन्हा वाढण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.

डॉ. टेड्रॉस (Dr. Tedros) यांनी म्हणाले की, ‘मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण जगभरात कमी होऊ लागलेले दिसून आले होते. व्यापक प्रमाणावर करण्यात येत असलेल्या लसीकरणामुळे हे शक्य झालं होतं. मुख्यतः युरोप आणि उत्तर अमेरिकेत हे घडून आलं. परंतु, आत पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू फैलावू लागला असून तो सातत्याने अधिकाधिक वेगाने प्रसार होऊ शकणारी त्याची रुपं बदलतो आहे, असा इशारा देखील डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.

corona news | who chief tedros adhanom clears about third wave of corona delta variant spread and vaccination

दरम्यान, डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) विषयी माहिती देताना त्यांनी सांगितलं आहे की, ‘जगातल्या जवळपास 111 देशात आता डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant ) फैलाव झाला आहे. लवकच तो जगभरात अस्तित्वात असलेल्या कोरोनाच्या विषाणू प्रकारांपैकी सर्वाधिक धोकादायक प्रकार होण्याची शक्यता आहे. तसेच कदाचित आत्तापर्यंत तो धोकादायक झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, गेल्या सलग 4 आठवड्यांमध्ये जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्याचबरोबर, 10 आठवडे सातत्याने कमी झाल्यानंतर कोरोना मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झालीय असं एका वृत्तानुसार समोर आलं आहे.

पुढे डॉ. टेड्रॉस (Dr. Tedros) यांनी सांगितलं आहे की, ‘सध्या जगात विविध देशांना लसपुरवठा करण्यात धक्कादायक असा भेदभाव केला जात असून जीवनावश्यक सामग्रीच्या उपलब्धतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर देशादेशात असमानता दिसून येते. या दरम्यान, डॉ. टेड्रॉस यांनी लसींचा अपुरा पुरवठा होणाऱ्या देशाबाबत गंभीर चिंता व्यक्त केलीय. तसेच, त्यांनी म्हटलं आहे की, ‘देशांना पुरवण्यात येणाऱ्या लसीच्या डोसमुळे जगात 2 प्रकारच्या कोरोनाच्या साथी दिसून येताहेत. पहिली साथ अशा देशात आहे जिथे मोठ्या प्रमाणावर लसीचा पुरवठा केला जातोय, या देशात निर्बंध उठवले जात आहेत. तर दुसरी साथ अशा देशात आहे जिथे लस पुरवठा अत्यंत कमी अथवा नाहीच आहे. या देशांना कोरोना विषाणूच्या भरवशावर सोडून देण्यात आलं असल्याचं WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस (Dr. Tedros) यांनी सांगितलं आहे.

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 241 रुग्णांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  corona news | who chief tedros adhanom clears about third wave of corona delta variant spread and vaccination

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update