Coronavirus : ‘कोरोना’चा हाहाकार ! अमेरिकेत एका दिवसात 1.5 लाखांहून अधिक रुग्ण

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेत ( us) मागील 24 तासांत दीड लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना विषाणूने (Coronavirus) अमेरिकेत ( us) गंभीर रुप धारण केले आहे. यामुळे देशातील बाधितांची संख्या वाढून २०७८६००१ झाली आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे (Coronavirus) ३.५३ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत १६८१ कोरोना रुग्णांच्या मृत्यूबरोबर मृतांचा आकडा ३,५३,१३१ पर्यंत गेला आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील विज्ञान आणि इंजिनिअरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोनाने विक्राळ रुप धारण केले आहे. मागील २४ तासांत १ लाख ६२ हजार ४२३ नवीन प्रकरणे समोर आल्याने देशातील बाधितांची संख्या २०७८६००१ पर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, कोलरॅडो आणि फ्लोरिडा प्रांतात ब्रिटनमध्ये नुकताच आढलेला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, देशात फायझर, मॉडर्नाच्या कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर लशीकरणाचे अभियान मोठ्याप्रमाणात सुरु झाले आहे

दरम्यान, अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास आणि कॅलिफोर्निया प्रांत कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये ३८,५९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये आतापर्यंत २८,५५१ जणांच्या मृत्यूचे कारण कोरोना आहे. कॅलिफोर्नियामध्ये कोविड-१९ मुळे आतापर्यंत २६,६६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर फ्लोरिडामध्ये कोविड-१९ मुळे २२०९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर न्यूजर्सीमध्ये १९,२२५ इलिनॉयसमध्ये १८,४१२, मिशिगनमध्ये १३,३९१, मॅसाच्युटे्समध्ये १२,६१० आणि पेनसेल्वेनियामध्ये कोरोनामुळे १६,३३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.