Corona Virus : आता दक्षिण कोरियात ‘कोरोना’ व्हायरसचा ‘हाहाकार’, चीनमध्ये 2600 बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीननंतर आता कोरोना विषाणू दक्षिण कोरिया मध्ये गेला आहे.चीनमध्ये कोरोनाचे आणखी १५० बळी गेले असू एकूण २६६३ वर बळींची संख्या पोहचली आहे. त्याचबरोबर चीनमध्ये ७७ हजारांवरती करोनाग्रस्तांची संख्या पोहचली आहे.

दक्षिण कोरिया, इराण आणि इटली या देशांना कोरोना विषाणूने घेरले आहे. मागील काही आठवड्यापासून तेथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. इराणमध्ये आठ बळी नोंदविण्यात आले आहेत कुवेतमध्ये सोमवारी ‘करोना’चे पहिले रुग्ण नोंदविण्यात आले त्याचबरोबर. दक्षिण कोरियात संसर्ग वाढला असून, आणखी १६१ रुग्ण नोंदविले आहेत. एकूण रुग्णसंख्या ही ८९३ वर पोहोचली आहे. इटलीमध्ये १५० पेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अफगाणिस्तानही करोना विषाणूचा पहिला रुग्ण नोंदविण्यात आला. नागरिकांनी देशाच्या पश्चिमेकडे विशेषत: इराणच्या दिशेने प्रवास करणे टाळावे, अशी सूचना अफगाण सरकारने केली आहे.

अधिवेशन पुढे ढकलले
चीन सरकारने ‘करोना’च्या संसर्गामुळे संसदेचे वार्षिक अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. असे जाहीर केले आहे. हे अधिवेशन ५ मार्च रोजी होणार होते. हे वार्षिक अधिवेशन दोन आठवडे चालते . चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) संयुक्त पथकाने हुबेई प्रांताला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

विमानफेऱ्या रद्द
इस्लामाबाद :
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान विमानाच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे पाकिस्तानने यापूर्वी जाहीर केले होते.पाकिस्तानने चीनकडे जाणाऱ्या विमानांच्या १५ मार्चपर्यंत रद्द केली आहेत. दरम्यान, चीनने पाकिस्तानला करोना विषाणूची चाचणी करण्यासाठी वैद्यकीय साधने पुरवली आहेत.