चांगली बातमी ! देशात कोविडवर दुसरी लस तयार होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. कोरोनावर तयार करण्यात आलेल्या डीएनए लस झायकोव्ह-डी ची मानवी चाचणी सुरु केली आहे. भारतातील औषध निर्मिती करणारी कंपनी झायडस कॅडिला या कंपनीने ही लस तयार केली असून डीएनए लशीचा पहिला डोस एका रुग्णाला चाचणी प्रक्रियेअंतर्गत देण्यात आला आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी मागील दोन महिन्यांत या कंपनीला मानवी चाचणीची मंजूरी दिली आहे.

कंपनीने सांगितले की पहिला मानवी डोस चाचणी एक हजार स्वयंसेवकांवर सुरु करण्यात आला आहे. या मानवी क्लिनिकल चाचण्यांचे पहिला आणि दुसरा टप्पा एका पाठोपाठ पूर्ण केले जाणार आहेत. झायकोव्ह-डी, प्लाझमिड डीएनए लस सुरक्षित मानली गेली आहे. याआधी या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासंदर्भातील चाचणीचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. काही दिवसांपूर्वी झायकस कॅडिला मानवी चाचणी घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री इंडियानुसार क्लिनिकल परीक्षणाचे दोन मापदंडावर आधारित असणार आहे. पहिला टप्प्यात कंपनीने 18 ते 55 वर्षे वयोगटातील निरोगी पुरुष आणि स्त्रियांना (गर्भवती नाही) निवडले गेले आहेत. निवडण्यात आलेल्या स्वयंसेवकांना चाचणी प्रक्रियेचे पालन करावे लागते. तसेच फॉलोअप कालावधीसाठी त्यांना सतत उपलब्ध असावे लागते. यासाठी 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही निरोगी स्वयंसेवकाची निवड केली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदगार ठरलेल्या रिमडेसिव्हीर सध्या भारतात उपलब्ध आहे. डीसीजीआयने सिप्ला आणि हेटरो हेल्थकेअरला रिमडेसिव्हिर तयार करण्याची परवानगी दिली आहे. हे आणीबाणीच्या काळात वापरले जाते. भारतात कोविफोर आणणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे सध्या वैद्यकीय पायाभूत सुविधांवर बराच दबाव असल्याचे हेटरो हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक एम श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.