खळबळजनक ! ऑक्सिजन संपल्याने 8 रुग्णांचा मृत्यू; नर्ससह डॉक्टर ‘गायब’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाल्याने दिल्लीतील एका रुग्णालयात 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गुरुग्राम परिसरातील सेक्टर 56 मधील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी (दि. 30) रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरर्स, नर्स आणि मेडिकल स्टाफ फरार झाला आहे. घटनेला 6 दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुंटुंबातील लोकांचा संताप अनावर झाला आहे.

जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाबाबत अद्यापही मौन बाळगले आहे. दरम्यान रुग्णालयाच्या बाहेरील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात रुग्णांचे नातेवाईक रडताना दिसत आहेत. मृताच्या नातेवाईकांना पोलिसांनी अनेकदा विनवण्या केल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांचा मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. किर्ती रुग्णालयातील मेडीकलमध्ये काम करणा-या एका तरुणाने सांगितले की, 30 एप्रलिला रात्री उशीरा मी तिथेच उपस्थित होतो. ऑक्सिजन संपल्यामुळे 8 लोकांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात आधीच 8 रुग्णांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांची अवस्था फारच वाईट झाली आहे. अशा स्थितीत दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे.