Pune : पुण्याच्या कोव्हिड रूग्णालयात धक्कादायक घटना ! कोरोनाबाधितांचे दागिने लंपास, महिलेसह दोघांना अटक

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेच्या कोव्हिड(covid) सेंटरमधून कामगार महिलेनेच साथीदाराच्या मदतीने मृत्यू झालेल्या रुग्णांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी सहा ते सात कोव्हिड(covid) रुग्णांचे दागिने चोरले आहेत.

Coronavirus : ‘या’ राज्याने लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढवला

याप्रकरणी अजयश्री म्हसकर (वय 25) यांनी तक्रार दिली आहे। त्यानुसार 36 वर्षीय कामगार महिला आणि साथीदार अनिल तुकाराम संगमे (35) या दोघांना अटक केली आहे.

Pimpri : अवैधरित्या दारुची वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात

महापालिकेचे बाणेर परिसरात कोव्हीड सेन्टर आहे. येथे संबंधित महिला काम करत होती. दरम्यान कोरोना सुरू झाल्यापासून येथे हे रुग्णालय सुरू केले आहे. काहींना ICU मध्ये दाखल केले जात असे. यावेळी या महिलेने कोरोना गंभीर, ICU उपचार घेत असलेल्या रुग्णांचे 1 ते 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. तर काही मृत झालेल्या रुग्णांच्या अंगावरील देखील दागिने चोरल्याचे समोर आले आहे. दागिने चोरल्यानंतर हे दागिने ती अनिल याच्याकडे देत असे. अनिल हा तिचा साथीदार आहे.

Baba Ramdev Vs IMA : ‘ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक करतायत ‘मानहानी’चा दावा’

दरम्यान, काही रुग्णांनी रुग्णालय प्रशासनास हा प्रकार सांगितला. त्यांनी सीसीटीव्हीची लंडतळणी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिला गेल्या सप्टेंबर 2020 पासून येथे काम करत होती. मध्यंतरी रुग्ण कमी झाल्यानंतर या महिलेला 1 महिन्याचा ब्रेक दिला होता. पुन्हा रुग्ण संख्या वाढली असता तिला कामावर बोलवण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक माळेगावे हे करत आहेत.

 

 

PM Jan-Dhan Account : तुमचे जन धन खाते आहे ? मग घ्या 1.3 लाखांचा लाभ, जाणून घ्या

ऑक्टोंबरपासून बिग बॉसचा 15 सिझन, यंदा ‘कपल शो’ची शक्यता; ‘भाईजान’ सलमाननं हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कलाकारांचा शोध सुरु

‘100 कोटींची वसुली 300 कोटींवर, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा’