धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘या’ क्वारंटाईन सेंटरमध्ये ‘कोरोना’ रूग्णावर युवकानं केला बलात्कार, आरोपी देखील ‘संक्रमित’

पनवेल : पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कोन गावात कोविड क्वारंटाइन सेंटरमध्ये बुधवारी रात्री एका महिलेवर बलात्कार झाला. हैराण करणारी बाब म्हणजे बलात्कार करणारा आरोपी आणि पीडित महिला दोघेही कोरोना रूग्ण आहेत.

पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमधील कोन गावात इंडिया बुल्सच्या रिकाम्या इमारतीमध्ये पनवेल आणि नवी मुंबई महापालिकाने कोविड क्वारंटाइन सेंटर बनवले आहे. येथे कोरोना संक्रमित आरोपी आणि पीडित काही दिवसांपूर्वी दाखल झाले होते.

 

 

 

 

 

 

प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की, पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत. कोरोना संक्रमित झाल्याने त्यांना एकाच वार्डात ठेवले होते. सध्या पोलीस महिलेच्या आरोपाचा तपास करत आहेत.

पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले की, इंडिया बुल क्वारंटाइन सेंटरमध्ये एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने भरती केले होते. याच सेंटरमध्ये आरोपीवर उपचार सुरू होता. घटना समोर आल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आरोपी कोरोना संक्रमित असल्याने त्याला अद्याप अटक केलेली नाही. पोलीस तपास करत आहेत.

तर, ही घटना समोर आल्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस क्वारंटाइन सेंटरमध्ये उपस्थित डॉक्टर्स आणि रूग्णांकडे चौकशी करत आहेत. परंतु, कोरोनामुळे त्यांना खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.