धक्कादायक ! ‘कोरोना’ पॉझिटिव्ह महिलेला कुत्र्यासोबत वॉर्डमध्ये बंद करुन गायब झाले कर्मचारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना वेगवेगळ्या राज्यातील रुग्णालयांकडून दुर्लक्ष केल्याची घटना घडली आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या दुर्लक्षाची अशीच एक घटना गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातून समोर आली आहे. मोरबीच्या वानकानेर येथील रूग्णालयात एक कोरोना-बाधित महिलेला कोविड -19 प्रभागात ठेवण्यात आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेला कर्मचाऱ्यांनी वॉर्डमध्ये बंद करुन बाहेरून कुलूप लावून घरी निघून गेले.

या संपूर्ण घटनेतील आश्चर्याची बाब म्हणजे वॉर्डमध्ये महिलेसह कुत्रा देखील होता. महिलेला दवाखान्यातून सोडण्यात आल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हवर आल्यानंतर दहा दिवसांपूर्वी त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असे वृत्त आहे की, 7 जुलै रोजी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी त्या महिलेला वॉर्डात कुत्र्यासोबत बंद करुन बाहेरुन कुलूप लावून निघून गेले.

ही संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर आता रुग्णालय प्रशासन काहीही बोलण्यास नकार देत आहे. या महिलेने सांगितले की, तिने रात्रभर आवाज दिला पण कोणीही तिचा आवाज ऐकला नाही. रात्री काही लोक उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांनी महिलेला वॉर्डमध्ये बंद ठेवलेले पाहिले. यानंतर लोकांनी प्रभाग बाहेरून महिलाचे व्हिडिओ बनवले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like