Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 62 हजारापेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 20 लाखाच्या पुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग प्रत्येक दिवशी नवीन रेकॉर्ड बनवत आहे. संक्रमितांचा आकडा 20 लाखांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी विक्रमी 62 हजार 538 नवे रूग्ण वाढले. एका दिवसात 886 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या 20 लाख 27 हजार 74 कन्फर्म केस झाल्या आहेत. केवळ 21 दिवसात 10 लाख केस वाढल्या आहेत. देशात कोरोनातून बरे होणार्‍यांचा रिकव्हरी रेट 67.61% आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, देशात कोरोनाच्या आता 6 लाख 07 हजार 384 अ‍ॅक्टिव्ह केस आहे. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 41 हजार 585 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 13 लाख 78 हजार 105 लोक बरे झाले आहेत आणि एक परदेशी नागरिक परतला आहे. मृत्युदर घसरून 2.07 टक्क्यांवर आला आहे.

भारतात 2.4% च्या दराने वाढत आहेत रूग्ण
भारतात 2.4% दराने रूग्ण वाढत आहेत. मागाील 7 दिवसात (29 जुलै-7 ऑगस्ट) भारतात 3.79 लाख रूग्ण आले. अमेरिकेत 3.76 लाख आणि ब्राझीलमध्ये 3.07 लाख संक्रमित सापडले. अमेरिकेत नवे रूग्ण रोज वाढण्याचा दर 1% आणि ब्राझीलमध्ये 1.6% आहे. म्हणजे सर्वात जास्त रूग्ण असलेल्या या तीन देशांपेक्षा रूग्ण वाढण्याचा जास्त दर भारतात आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी सर्वात जास्त 11 हजार 514 आणि आंध्र प्रदेशात 10 हजार 328 संक्रमित सापडले. गुजरातमध्ये मागील 24 तासात कोविड-19 ची 1,034 नवी प्रकरणे समोर आल्याने गुरुवारी राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 67,000 पेक्षा जास्त झाली आहे. तर आणखी 27 रूग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत 910 नव्या केस, आतापर्यंत 6645 मृत्यू
मुंबईत 910 नवीन प्रकरणे आल्याने एकुण प्रकरणांची संख्या गुरूवारी वाढून 1,20,165 झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने सांगितले की, मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमणामुळे आणखी 57 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे एकुण मरणार्‍यांची संख्या 6,645 झाली आहे. कोविड-19 चे आणखी 988 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मुंबईत बरे झालेल्या एकुण रूग्णांची संख्या 92,661 झाली आहे. मुंबईत कोविड-19 च्या रूग्णांचा बरे होण्याचा दर 77 टक्के आहे आणि 20,562 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंतच्या टेस्टींग
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, देशभरात 6 ऑगस्टपर्यंत 2,27,24,134 कोरोना सॅम्पलची तपासणी केली आहे. तर मागील 24 तासांत 5,74,783 सॅम्पलची तपासणी करण्यात आली.