Coronavirus : ‘सिंगर’ कनिकानं केलं वडिलांच्या ‘त्या’ विधानाचं ‘खंडन’ ! म्हणाली- ‘400 नाही 10 लोकांनाच भेटले’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवू़डमधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर हिची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव आली आहे. हैराण करणारी बाब अशी की, लंडनहून भारतात आलेल्या कनिकानं अगदी सहज साऱ्या टेस्ट क्लिअर केल्या. तिनं एअरपोर्टवरील ग्राऊंड स्टाफला वॉशरूमचं कारण सांगितलं आणि तिथून तपासणी न करताच ती बाहेर पडली. परंतु तिचे वडिल राजीव कपूर यांनी मात्र ही गोष्ट नाकारली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कनिकाचे वडिल राजीव यांनी सांगितलं की, लंडनहून आल्यानंतर ती 3-4 पार्ट्यांना गेली होती. ती जवळपास 300-400 लोकांना भेटली असावी.

बाप-लेकीच्या विधानात विरोधाभास

कनिकाला तिच्या वडिलांनी केलेल्या विधानाबद्दल विचारणा केली असता तिनं त्यांचं खंडन करत त्यांचं विधान चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणते की, ते असं सांगूच शकत नाहीत. कनिकानं सांगितलं की, लंडनहून भारतात आल्यानंतर मोठ्या मुश्किलीनं ती 10 ते 30 लोकांना भेटली असेल. इतकेच नही तर जेव्हा फ्लूची लक्षण दिसली तेव्हा मी इतरांना याबद्दल सांगितलं असंही ती म्हणाली.

समोर आलेल्या माहितीनुसार, कनिका लंडनहून परत आल्यानंतर लखनऊमधील एका पार्टीत गेली होती. यात जवळपास 100 लोकांचा समावेश होता. कनिका कपूर खासदार दुष्यंत कुमार यांना भेटल्याचंही सांगितलं जात आहे. असं सांगितलं जात आहे की कनिकाला भेटल्यानंतर दुष्यंत संसदेत गेले.

आरोग्य विभागासाठी डोकेदुखी बनली कनिका

कनिका कोरोना पॉझिटीव असल्याचं समजल्यानंतर आता आरोग्य विभागासाठी नवीन डोकेदुखी सुरू झाली आहे. कनिका ज्या इमारतीत राहते तिथपासून तर ज्या लोकांना ती भेटली आहे त्या सर्वांमध्ये आता गोंधळ सुरू झाला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं. त्याची सर्व प्रकारे तपासणी केली जाते. अशात असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे की, कनिकानं कोरोना टेस्ट कशा प्रकारे पास केली. कशा प्रकारे तिला आयसोलेशनमध्ये न ठेवताच घरी जाण्यासाठी परवागनी दिली गेली आहे.