खोटं बोलून विमानात बसणे ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाला पडलं महागात; एका तासात गमावावा लागला जीव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खोटं बोलून विमानात बसणे एका कोरोनाग्रस्त रुग्णाला महागात पडलं. खोटं बोलल्यामुळे त्याला तासात जीव गमावावा लागल्याचं समोर आलं आहे. हि घटना अमेरिकेतील एका फ्लाईटमध्ये घडलीय.

मृत व्यक्तीच्या पत्नी यांनी वैद्यकिय विभागाला माहिती दिली आहे, त्या माहितीनुसार, मागील एका आठवड्यापासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्यांनी वास घेण्याची आणि चवीची क्षमता गमावली होती. दरम्यान, त्यांनी कोरोनाबाधित असल्याचे सांगितले नव्हते. लॉस एंजेलेस शहरातून जाऊन कोरोनाची लागण झाल्याबाबत चाचणी करून घेणार आहे, असे असल्याचे सांगितले होते.

रिपोर्ट्सनुसार विमानाने उड्डान घेण्याअगोदर एक व्यक्ती खूप थरथरत होती. त्यानंतर या व्यक्तीला घाम आला, श्वास घ्यायला त्रास झाला. विमानाने उड्डान घेतल्यानंतर या व्यक्तीची शारीरिक स्थिती आणखी गंभीर झाली. त्यानंतर विमानाला न्यू ओरलिएन्समध्ये इमरजेंसी लँडींग करावे लागले. या व्यक्तीची गंभीर स्थिती पाहता अनेक प्रवासी मदतीसाठी पुढे आले. वैद्यकिय टीमधील एका व्यक्तीने त्यांना सीपीआरही दिला होता.

या व्यक्तीने विमानामध्ये मास्कचा वापर केला होता. विमानामध्ये एक तास प्रवास केल्यानंतर या व्यक्तीची श्वास घेण्याची क्रिया बंद झाली. त्यानंतर केबिन क्रू मेंमर्सनी वैद्यकिय विभागाची मदत घेतली. त्यानंतर टोना एल्डापा नावाच्या व्यक्तीने संक्रमणाची पर्वा न करता या व्यक्तीचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्या व्यक्तीने आपले प्राण गमावले होते.

याबाबत टोनी यांनी ट्विट करत सांगितले, ”जो व्यक्ती कोरोनाबाधित होता. त्याचा सीपीआरच्या माध्यमातून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. यात खूप जोखिम होती. मी या व्यक्तीच्या पत्नीशी मेडिकल हिस्ट्रीबाबत विचारणा केली असता कळाले की, ह्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ती कोरोना पॉझिटिव्ह आहे, तरीही हि व्यक्ती प्रवास करताना हि बाब लपवून ठेवली होती. लॉस एंजेलेसमध्ये या व्यक्तीची कोरोना टेस्ट होणार आहे.

यानंतर आता आरोग्य अधिकारी इतर प्रवाशांची संपर्क करताहेत. फ्लाईट क्रू मेंमर्सना एक ते दोन आठवड्यांसाठी आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितलंय.

याबाबात एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, वैद्यकिय आपात्कालीन स्थितीमुळे आम्हाला विमान न्यू ओरलिएन्समध्ये लँड करावे लागलं. वैद्यकिय विभागाच्या टीमने या व्यक्तीला दवाखान्यामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतू याअगोदरच या व्यक्तीने प्राण सोडले होते.

आता यूनाइटेड एयरलाइन्सच्या निष्काळजीपणामुळे अनेकजण नाराज आहेत. अनेक प्रवाशांनी ट्विट करत , कोरोनाबाधित व्यक्ती विमानात येऊच कशी शकते? असा प्रश्न उपस्थित केलाय.