COVID-19 : आरोग्य मंत्र्यांच्या फॉर्म्युल्यापासून ‘या’ रूग्णांना रहावं लागेल ‘सावध’, घरीच असा जाणून घ्या ‘रेस्पिरेटरी’ रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही अडीच लाखांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर घाबरू नका. घरीच रेस्पिरिटरी रेट जाणून घेता येतो. आरोग्यमंत्र्यांनी याचा एक फॉर्म्युला सांगितला आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी हा फॉर्म्युला सांगितला आहे. कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आपला रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वसन दर तपासा. त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज आहे की नाही हे समजेल असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णांचा रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वसन दर एका मिनिटाला 15 पेक्षा जास्त आहे, ते सर्व मॉडरेट कॅटगिरीत येतात. ज्या रुग्णांचा श्वसन दर प्रति मिनिट 30 पेक्षा अधिक आहे ते गंभीर स्थितीत येतात. फक्त मध्यम आणि गंभीर परिस्थितीत येणाऱ्या रुग्णांनाच उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची गरज आहे.

फॉर्म्युल्याला आरोग्य तज्ज्ञांची सहमती नाही
लक्षण नसलेल्या किंवा सौम्य लक्षण असलेले रुग्ण ज्यांच्या रेस्पिरेटरी रेट 15 पेक्षा कमी आहे. त्यांना रुग्णालयात जाण्याची गरज नाही, ते होम क्वारंटाईन होऊ शकतात असं देखील सतेंद्र जैन यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यावर अनेक आरोग्य तज्ज्ञ सहमत नाहीत. ज्या रुग्णांना इतर आजार आहेत, त्यांना हा फॉर्म्युला लागू नाही होणार. कारण असे अनेक आजार आहेत, ज्याच्यामध्ये हेल्थ पॅरामीटर वरखाली होत असताना आणि या हेल्थ पॅरामिटरवर फक्त रुग्णालयातच लक्ष ठेवता येऊ शकतं, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

यांच्यावर लागू होत नाही आरोग्यमंत्र्यांचा फॉर्म्युला
दिल्लीतील मेडॉर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मनोज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फॉर्म्युला ज्यांना हृदयाची समस्या, ब्लड प्रेशर किंवा मधुमेहासारखा दुसरा कोणता आजार नाही अशा तरुण रुग्णांनाच हा फॉर्म्युला लागू होतो. जर तुम्ही कोरोनाग्रस्त आहात आणि तुम्हाला इतर आजार असतील तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. असे कित्येक वयोवृद्ध आहेत, जे घरात एकटे राहतात आणि त्यांची देखभाल फक्त रुग्णालयातच होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.

आपला श्वसन दर कसा जाणून घ्यावा
मेडॉर हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर मनोज शर्मा यांच्या मते, सामान्य श्वसन दर 12 ते 16 दरम्यान मानला जातो. जर श्वसनाचे दर 16 ते 28 दरम्यान असले तरीही जास्त काळजी करण्याची गरज नाही. श्वसन दर 28 पेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, घरात श्वसन दर जाणून घेणे हा एक अतिशय सोपा मार्ग आहे. यासाठी आपण रुग्णाच्या पोटावर हाताची घडी ठेवावी आणि एका मिनिटात पोट किती वेळा खाली जाते हे पहावे. वर खाली कितीवेळा होते ते मोजावे. श्वाोच्छवासासह पोटात हालचाल होत असल्याने रुग्णाच्या श्वसनाचा दर पोटाद्वारे सजपणे जाणून घेता येऊ शकतो, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.