मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात लवकरच खांदेपालट? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोना (Corona) संसर्गाच्या नियोजनात आलेले अपयश तसेच पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal) भाजपचा झालेला दारूण पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात (Reshuffle in Union cabinet) फेरबदलाची चर्चा सुरु झाली आहे. कोरोना (Corona) काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी शुक्रवारी (दि.11) रात्री गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah ) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president J P Nadda ) यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधान आले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मंत्रीमंडळ फेरबदलासाठी (Cabinet reshuffle) एकूण 23 खाते निवडल्याचे समजते. या खात्याच्या मंत्र्यांच्या कामाची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीनी चौकशी केली आहे. पंतप्रधानांनी आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी आदी मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. तसेच इतरही काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे अनेक मंत्र्यांवर (Minister) कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असेल

फेरबदलात कोणाच्या नावाची चर्चा
मंत्रिमंडळाच्या फेरबदलात (Cabinet reshuffle) आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

आता केंद्रीय मंत्रिमंडळात 59 मंत्री
कोरोनामुळे गेल्या एक वर्षापासून कॅबिनेटच्या विस्ताराची परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. मात्र मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 21 कॅबिनेट आणि 9 स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री आणि 29 राज्यमंत्री आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

Web Title : prime minister narendra modi reshuffle in union cabinet

हे देखील वाचा

Pune News | दुर्देवी ! बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23 डॉक्टरांनी गमावले प्राण

Pune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात तरूणाला लुटले

Spa Center in wakad and baner pune | वाकड, बाणेरमधील स्पाच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश; 2 जणांना अटक 5 महिलांची सुटका

Ajit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…

Pune News | पिस्तुल बाळगणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक