कोरोना : मयत शिक्षकाच्या कुटुंबियांना विमा कवच द्या, दोषींवर कारवाई करा, निवेदनातुन पाचंगे यांचा इशारा

शिरूर : प्रतिनिधी ( गजानन गावडे ) –    शिरुर तालुक्यातील शिरूर शहरात कोविड-१९ सर्वेक्षणाचे कर्तव्य बजावत असताना संसर्ग होऊन भरत नामदेव सरोदे हे शिक्षक मयत झाले असुन त्यांच्या कुटूंबियांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा क्रांतीवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व भाजप उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.

क्रांतीवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व भाजप उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील अभिनव विद्यालयातील शिक्षक भरत नामदेव सरोदे या ५१ वर्षीय शिक्षकांचे दि.१६ व १७ सप्टेंबर रोजी शिरुर नगरपालिका हद्दीत कोविड-१९ सर्वेक्षणाचे कर्तव्य  बजावताना कोरोनाचा संसर्ग होवून मृत्यू झाला. सदर शिक्षकाचे वय ५० पेक्षा जास्त होते व त्यांना हृदय विकाराचा त्रास होता. तरीही त्यांना कामाचे आदेश कसे देण्यात आले याची गांभीर्याने दखल घेवून चौकशी करण्याचे आदेश द्यावेत व दोषीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच कोविड योध्दा कै.भरत नामदेव सरोदे यांच्या कुटूंबियास ५० लाख रुपयाचा विमा मंजूर करण्यात यावा त्यासाठी संबंधीत शासयकीय विभागास योग्य ते प्रस्ताव सादर करण्याचे आदेश व्हावेत.तसेच जे कोविड योध्दे डयुटीवर कर्तव्य बजावत आहेत त्यांना ५० लाखाचा विमा संरक्षणाचे संरक्षण देण्यात यावेत. जर १४ ऑक्टोबर २०२० पर्यंत सदर शिक्षकाचा विमा प्रस्ताव शासनाकडे सादर न झाल्यास क्रांतीवीर प्रतिष्ठाण,समविचारी संघटना व भाजप उद्योग आघाडीच्यावतीने शिरूर तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे.