…तर डॉक्टर बनून जबाबदारी पार पाडू : IPS डॉ. प्रवीण मुंढे

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने राज्य सरकारने निवृत्त वैद्यकीय अधिकारी, नर्स यांनी हातभार लावाव असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले डॉ. प्रवीण मुंढे यांनी वेळ पडली तर डॉक्टर म्हणून जबाबदारी पाडण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. तसेच ही वेळ येणार नसल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे यांनी फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान आपण स्वत: डॉक्टर आहात कोरोनाच्या उपचारासाठी गरज पडली तर आपण डॉक्टर म्हणून जबाबदारी पार पाडाल का, असा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी डॉक्टर बनूनही जाबाबदारी पार पाडेने. पण अशी वेळ येणार नाही, असाही विश्वास डॉ. प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केला.