Corona Updates : कोरोनामुळे 24 तासात 279 मृत्यू, देशाच्या सर्व राज्यांमध्ये रिकव्हरी रेट 90% पेक्षा जास्त

नवी दिल्ली : नवीन वर्ष 2021 मध्ये कोरोना महामारीपासून सुटका मिळण्याची अपेक्षा वाढत चालली आहे. एकीकडे भारतात कोरोना व्हॅक्सीनची तयारी जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे संसर्गाच्या वेगाला सुद्धा ब्रेक लागताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्या वेगाने वाढण्यासोबतच अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांच्या संख्येत लागोपाठ घसरण झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशाच्या सर्व राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आता कोरोना रेट 90 टक्केपेक्षा जास्त झाला आहे. भारतात एकुण 2.77 टक्के अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. तर कोरोना रूग्ण बरे होण्याचा आकडा 97 लाख 40 हजारच्या पुढे गेला आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये बरे होण्याचा दर 90 टक्केपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये 73.56 टक्के बरे होणारे रूग्ण 10 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील आहेत.

मागील 24 तासात 18000 पेक्षा जास्त नव्या केस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी ताज्या आकड्यांनुसार, भारतात मागील 24 तासात कोरोनाच्या 18,732 नव्या केस समोर आल्या आहेत. तर 279 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दरम्यान 21,430 कोरोना रूग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाद्वारे रविवारी (27 डिसेंबर 2020) सकाळी 8 वाजेपर्यंत जारी कोरोनाचे आकडे –

देशात आतापर्यंत कोरोना रूग्णांची एकुण संख्या – 1,01,87,850
भारतात कोरोनाने मरणार्‍यांचा एकुण आकडा – 1,47,622
देशात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या – 97,61,538
देशात सध्या एकुण अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या – 2,78,690

भारतात कोरोना व्हॅक्सीनची तयारी
देशातील चार राज्यांत कोरोना व्हॅक्सीन देण्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन केले जात आहे. हे चार राज्य पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये होणार आहे. या चार राज्यांच्या दोन जिल्ह्यांमध्ये पाच ठिकाणी ड्राय रन केले जाईल.