दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (coronavirus) दुसर्‍या लाटेचा पीक आता संपला आहे. कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत तर अगोदरच घसरण नोंदली जात होती आणि आता मृत्यूंचे आकडेसुद्धा खाली येताना दिसत आहेत. कोरोनाच्या (coronavirus) दुसर्‍या लाटेच्या सुरूवातीपासून पहिल्यांदाच देशात कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा खाली आला आहे. मागील 12 आठवड्यानंतर कोरोनाने (coronavirus) होणार्‍या मृत्यूंच्या आकड्यात 17 टक्केपर्यंतची घसरण नोंदली गेली आहे.

 

पुण्यात साधे पेट्रोलही शंभरी ‘पार’ !

34 दिवसानंतर कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा 3 हजारच्या खाली पोहचला आहे. देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा वेग आता थंडावताना दिसत आहे. पूर्वोत्तर आणि लडाखचा काही भाग वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने कमी होत आहे.

 

Blood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत


तमिळनाडु, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि आसाममध्ये कोरोना संक्रमित रूग्णांच्या कमी होणार्‍या संख्येने आता संपूर्ण ग्राफवर परिणाम दाखवणे सुरू केले आहे.
ज्या राज्यात मागील आठवड्यापर्यंत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे वाढले होते, तिथे सुद्धा आता कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.

24 ते 30 मे च्या दरम्यान कोरोनाच्या 12.95 लाख केस समोर आल्या ज्या मागील आठवड्याच्या तुलनेत 27 टक्केपर्यंत कमी आहेत. अशाच प्रकारे मृत्यूच्या आकड्यांमध्ये मोठी घसरण नोंदली गेली आहे. भारतात 24 ते 30 मेच्या दरम्यान 24,372 मृत्यू नोंदले गेले, जे मागील आठवड्यात नोंदलेल्या 29,331 मृत्यूंपेक्षा 5,000 ने कमी आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत 94,844 लोकांचा मृत्यू
महाराष्ट्रात रविवारी एका दिवसात सर्वात कमी 18600 नवी रूग्ण आढळले. तर 402 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार, नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात एकुण प्रकरणे 57,31,815 झाली आहेत, तर संसर्गामुळे एकुण 94,844 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

Also Read This : 

 

Flipkart वर ‘या’ 5 सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन घरबसल्या जिंका ‘भरघोस’ बक्षिसे आणि मिळवा ‘डिस्काऊंट’ व्हाऊचर, जाणून घ्या प्रोसेस

 

Sugarcane Juice In Pregnancy : गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…

 

व्हॅक्सीन घेतलेले लोक सुद्धा पसरवू शकतात का कोरोना, जाणून घ्या रिसर्चमध्ये काय आले समोर

 

 

लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर