हडपसर : गरजू सलून व्यावसायिकांना सुरक्षा कीटचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागिल तीन महिन्यपासून सलून व्यवसाय बंद होते. शासनाने 28 जूनपासून सलून व्यवसाय सुरू केले. मात्र, सलून व्यवसायातील सुमारे 150 गरजूंना सुरक्षा किटचे वाटप केले. सुरक्षेची गरज व व्यवसायावर उत्पन्न अवलंबून असल्यामुळे अनेक सलून दुकानदारां कडून या किटसाठी मागणी होत आहे, असे पुणे शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर जगताप यांनी सांगितले.

जगताप म्हणाल की, सलून कारागीर सुरक्षा, ग्राहक सुरक्षा यांना प्राधान्य देऊन संपूर्ण दुकानाचे निर्जंतुकीकरण, दुकानातील साहित्य निर्जंतुकीकरण, सुरक्षा कवच, सॅनिटायझर, मास्क, फेस शिल्ड, ग्लोव्हस इ. साहित्य संचाचे वितरण भारत माता अभ्यासिक पार्वती पायथा येथे करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे शहर पदाधिकारी व सेवा सहयोगचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पर्सिस्टंट आणि झेड एस कंपनी यांच्या सीएसआर फंडमधून हे किट देण्यात आले आहेत. अजून काही कंपनीचे सहकार्य मिळाल्यास अनेक सलून पर्यंत पोहोचता येऊ शकते.