COVID-19 बाबत मोठी बातमी, भारतातील रूग्णांमध्ये सापडला वेगळ्या पद्धतीचा ‘कोरोना’ व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद येथील सेल्युलर आणि आण्विक जैव विज्ञान केंद्राच्या (सीसीएमबी) संशोधकांनी देशात कोविड-19 चा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरसचा शोध लावला आहे. हा दक्षिणेतील राज्य तमिळनाडु आणि तेलंगानामध्ये मोठ्याप्रमाणात आढळला आहे.

संशोधकांनी व्हायरसच्या या वेगळ्या समुहाला ‘क्लेड ए3आय’ नाव दिले आहे, जो भारतात 41 टक्के आढळला आहे. संशोधकांनी 64 जीनोमचा अंदाज तयार केला आहे.

सीसीएमबीने ट्विट केले की, भारतात सार्स-सीओव्ही2 च्या प्रसाराच्या जीनोम विश्लेषणावर एक नवे तथ्य समोर आले आहे. यातून हे स्पष्ट झाले आहे की, विषाणुचा एक वेगळा समुहसुद्धा आहे आणि तो भारतात आहे. यास क्लेड ए3आई नाव देण्यात आले आहे.

यात म्हटले आहे, असे दिसते की, हा समुह फेब्रुवारी 2020 मध्ये विषाणुतून उत्पन्न झाला आणि देशभरात पसरला. यामध्ये भारतातून घेतलेल्या सार्स-सीओवी2 जीनोमचे सर्व नमून्यांचे 41 टक्के आणि सार्वजनिक करण्यात आलेल्या जागतिक जीनोमच्या साडेतीन टक्के आहे.

सीसीएमबी संशोधक तथा औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआर) अंतर्गत येते. या विषाणुवर केलेल्या संशोधनात हे आढळून आले आहे की, विषाणुचे फेब्रुवारीमध्ये सहयोगी वशंज होते.

सीसीएमबीचे संचालक आणि शोधपत्राचे सहलेखक राकेश मिश्रा यांनी म्हटले की, तेलंगाना आणि तमिळनाडुचे बहुतांश सॅम्पल व्हायरसच्या या नव्या क्लस्टरशी म्हणजेच क्लेट ए3आयशी मिळते-जुळते दिसून आले आहे.

मिश्रा म्हणाले, बहुतांश सॅम्पल तेव्हाचे आहेत, जेव्हा भारतात प्रसाराला सुरूवात झाली होती. दिल्लीच्या काही सॅम्पलमध्ये थोडी समानता आहे, परंतु, महाराष्ट्र आणि गुजराच्या सॅम्पलमध्ये कोणतीही समानता नाही. येत्या काळात आखणी सॅम्पलची जीनोम सीक्वेंसिंग करण्यात यावी, ज्यातून या विषयात आणखी माहिती मिळू शकेल.