Corona Second Wave : ताप नसला तरी कसं ओळखायचं कोरोना झाला की नाही? ‘ही’ 10 लक्षणे आहेत मोठे संकेत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. ताप, सर्दी, खोकला हे सामान्य आजारच कोरोनाची प्रमुख लक्षणे असल्याचे पाहिला मिळते. मात्र, ताप नसला तरी कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला की नाही? हे कसं ओळखायचं हा प्रश्न पडतो.

कोरोनाबाधित रुग्णाला सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण ही लक्षणे प्रामुख्याने पाहिली जातात. पण ताप नसला तरी कोरोना आहे की नाही हे समजू शकते.

तर जाणून घ्या कसं ओळखायचा ते…

डोळे लाल होणे –  चीनमध्ये केलेल्या अभ्यासातून समोर आले की नव्या स्ट्रेनवर विशेष लक्ष दिले तर कोरोनाबाधित रुग्णामध्ये इन्फेक्शन दिसून येते. रुग्णांचे डोळे काही प्रमाणात लाल किंवा गुलाबी दिसून येतात. डोळ्यातून पाणी येणे, सूज येणे यांसारखीही लक्षणे दिसू शकतात.

सातत्याने खोकला –  सातत्याने खोकला आल्यास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सातत्याने येणाऱ्या खोकल्यावर कोरोनाप्रमाणेच उपचार करावा.

श्वसनास त्रास –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसत आहे. दमा असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत असेल तर तुम्ही लगेचच ऑक्सिमिटरवर ऑक्सिजन लेव्हल तपासणे गरजेचे आहे. 94 पेक्षा लेव्हल खाली आल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे.

छातीत दुखणे –  छातीत दुखणे हे कोरोनाचे घातक लक्षण मानले जाते. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. जर तुमच्याही छातीत दुखत असेल तर तुम्हीही डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

चव आणि वास न येणे –  जर तुम्हाला वास आणि चव समजत नसेल तर हे दोन्हीही कोरोनाचे असामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे शरीरात ताप येण्यापूर्वी दिसू लागतात. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना हे जाणवत नाही.

अशक्तपणा –  खोकला आणि तापाशिवाय कोरोनाबाधित रुग्णाला अनेकदा अशक्तपणा आणि थकल्यासारखे वाटते. हे इतर व्हायरल इन्फेक्शनमुळेही होऊ शकते. पण याकडेही दुर्लक्ष करू नये.

घशात खवखव –  कोरोना आणि सर्दी किंवा तापामुळे झालेल्या घशात दुखल्यासारखे वाटते. जर तुम्हाला ताप किंवा खोकलासह घशात खवखव जाणवत असेल तर ही कोरोनाचीच लक्षणे आहेत.

डायरिया –  कोरोनाच्या अनेक रुग्णांना डायरियाची लक्षणे दिसतात. त्याने रुग्णाच्या पोटात गंभीर समस्या निर्माण होते. उल्टी होऊ लागते.

मांसपेशी आणि सांधेदुखी –   कोरोनाबाधितांच्या अनेक रुग्णांना विशेषत: ज्येष्ठांना मांसपेशी आणि सांधेदुखी होऊ लागते. मांसपेशी जोपर्यंत दुखतात व्हायरस टिश्यू आणि सेल्सवर हल्ला करतात.