46 देशांच्या विश्लेषणात झाला खुलासा, ‘कोरोना’ची दुसरी लाट खुपच धोकादायक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होते. पण आता कोरोना व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यानंतर आता जगभरातील 46 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला जात आहे. त्यावरून कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘द इकोनॉमिस्ट’ने जगभरातील 46 देशांमध्ये कोरोना महामारीच्या दुसरी लाटेचा अभ्यास केला जात असल्याचे सांगितले. ही दुसरी लाट युरोपातील देशांवर परिणाम करत आहे. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड, स्पेन आणि स्वीडन या देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा उद्रेक केला आहे. इतकेच नाही तर अमेरिकेत ऑक्टोबरपासून ते डिसेंबर या महिन्यादरम्यान कोरोनाच्या दुसरी लाटेत अनेकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अमेरिकेत मार्चपासून ते ऑक्टोबरदरम्यान कोरोनाचे एकूण 1 कोटी प्रकरणं समोर आली होती. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वाढून 2 कोटी झाले आहेत. फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे नुकसान झाले.

आफ्रिका, ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट
ब्रिटन, आफ्रिका या देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा आणि जास्त संक्रमक स्ट्रेन कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतच समोर आला आहे. यावेळी ब्रिटन आणि आफ्रिका येथे कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने सर्वाधिक धुमाकूळ घातला. इतकेच नाही तर हा नवा कोरोना स्ट्रेन जगभरात झपाट्याने पसरत आहे.

इस्त्रायलमध्येही कोरोनाचा कहर
जगातील विविध देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असताना इस्त्रायल देशातही कोरोना व्हायरसचा कहर पाहिला मिळत आहे. या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.