पूर्व हवेलीसह वाघोली येथील कोरोना परिस्थितीचा खा. अमोल कोल्हे यांनी घेतला आढावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शिरुर लोकसभेचे खासदार डाॕ.अमोल कोल्हे यांनी पूर्व हवेली सह वाघोली परिसराला कोविड सेंटर व लसीकरण केंद्रांना भेट देत पाहणी करत लसीकरणाबाबतचा आढावा घेतला.
पूर्व हवेली तालुक्यात तसेच वाघोली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजच्या बाबतचा आढावा घेत काही सुचना केल्या .
यावेळी बोलताना डाॕ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

पूर्व हवेलीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करणे व लसीकरणावर अधिक भर देणार असल्याचे सांगितले. तर लस कमी प्रमाणात मिळत असल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. वाघोलीसह इतर ठिकाणी अधिक लसींचे डोस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर राज्यातील मिञ पक्षाला लसीकरणावरुन राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिला. तर जे हॉस्पिटल कोविड रुग्णाची लूट करतील त्यांचे ऑडिट करून दोषींवर कारवाई करण्यासाठी भाग पडणार असे देखील सांगितले .

यावेळी वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी दहा लाख रुपये कोविड साठी मदत करणार असून आपण याबाबत मार्गदर्शन करावे अश्या असायचं पत्र खासदार यांना दिले. यावेळी खासदार कोल्हे यांनी राज्यातील दानशूर व्यक्तिंनी पुढे येत कोविड रुग्णनांना मदत करावी असे बोलून सातव यांचे आभार मानले. या प्रसंगी हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तहसीलदार विजयकुमार चोबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात, वर्षा राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर ,सरपंच वसुंधरा उबाळे, रामदास दाभाडे, राजेंद्र सातव पाटील, बाळासाहेब सातव, गणेश सातव, सुधीर भाडळे, इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.