कोल्हापूरात ‘कोरोना’ संशयिताचा मृत्यु

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुळचा हरियाणा येथील असलेल्या एकाचा कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये सोमवारी मृत्यु झाला. कोरोना संशयित म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथेच त्याचा आज मृत्यु झाला आहे.

या हरियाणाच्या पुरुषात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याचा नमूना तपासणीसाठी पाठविण्यात आला व तोपर्यंत त्याला विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यु झाला. त्याच्या नमून्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो आज येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला आहे.
हा मुळचा हरियाणा पुरुष दिल्ली, मुंबई आणि कोल्हापूर व तेथून हातकंणगले येथे आला होता.

त्यामुळे त्याच्या नमून्याचा अहवाल नेमका काय येतोय तो कोरोनाबाधीत होता का हे अहवाल आल्यानंतरच समजणार आहे. तो बाधीत असले तर तो प्रवासात कोणाला भेटला याची माहिती घेण्यात येणार आहे.