Corona Symptoms : खोकल्यामध्ये दिसणारी ‘ही’ 5 लक्षणे कोविड-19 चा संकेत, समजू नका ‘कोल्ड-फ्लू’; जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या विध्वंसादरम्यान मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हायजीनला मेंटन ठेवणे खुप आवश्यक आहे. कोरोनाच्या या संकट काळात जर तुम्हाला थोडे जरी अस्वस्थ किंवा आजारी असल्याचे जाणवत असेल तर घरात राहून आपली देखभाल करा. कोरोना किंवा सामान्य होणारा खोकला ओळखणे तसे अवघड आहे, परंतु जर तुम्ही विशेष लक्ष देऊन पाहिले तर कोविड-19 चा खोकला किंवा इतर लक्षणे ओळखू शकता.

कॉमन कोल्ड किंवा कोविड-19 दोन्ही आपल्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टला प्रभावित करणार्‍या व्हायरसच्या संपर्कात येण्याने होते. व्हायरसचे छोटे-छोटे ड्रॉपलेट खोकताना, शिंकताना किंवा बोलातना एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होतात. मात्र, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, या दोन्हींचेही व्हायरस वेगळे असतात आणि त्यांची लक्षणे सुद्धा वेगळी आहेत. कॉमन कोल्डच्या तुलनेत कोविड-19 ची लक्षणे जास्त गंभीर आणि घातक आहेत. हे कॉमन कोल्डच्या तुलनेत जास्त दिवसापर्यंत राहू शकतात.

1 सुका खोकला –
सुका खोकला कोरोना व्हायरसचे एक कॉमन लक्षण आहे. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 59 ते 82 टक्के कोरोना रूग्णांना सुरुवातीला सुका खोकला होतो. डब्ल्यूएचओ आणि चीनच्या फेब्रुवारी 2020 च्या एका स्टडीनुसार, 68 टक्के लोकांमध्ये सूक्या खोकल्याची लक्षणे आढळली आहेत, जे दुसरे सर्वात कॉमन लक्षण आहे.

2 सतत खोकल्याची समस्या –
सतत खोकला होणे हे कोरोना व्हायरसने संक्रमित होण्याचे लक्षण आहे. खोकताना एकाच प्रकारचा आवाज येतो. आवाजावर थोडा परिणाम होतो.

3 श्वास घेण्यास त्रास –
खोकला आणि तापासह श्वास घेण्यास त्रास हा कोरोना व्हायरसने संक्रमित होण्याचे मजबूत संकेत आहे.

4 घशात खवखव –
घशात खवखव एखाद्या नॉन सीरियस डिसीज किंवा कोरोना व्हायरसमुळे सुद्धा होऊ शकते. हे सामान्य लक्षण आहे. जर सुका खोकला, ताप, थकव्यासह घशात खवखव होत असेल तर हा कोल्ड किंवा फ्लू नसून कोरोना व्हायरस असू शकतो.

5 लॉस ऑफ स्मेल-
सूका खोकला आणि तापासह वास घेण्याची शक्ती सुद्धा प्रभावित होत असेल तर हे कोरोना व्हायरसचे लक्षण आहे. खोकलाऐवजी लॉस ऑफ स्मेलचे सुद्धा लक्षण असू शकते.