Corona Symptoms : ‘हा’ त्रास ‘कोरोना’चं लक्षणं असू शकतं, कसा ओळखाल शरीरात झालेला बदल?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल आहे. कोरोनाचे नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी दिलल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमण झाल्यानंतर लोकांना छातीत दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे छातीत दुखणे हे श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे उद्भवू शकते. छातीत दुखण्यासोबत, कोरोनाची इतर लक्षणे असू शकतात, जसे ताप, खोकला आणि चव किंवा वास न येण्याच्या समस्या. जर कोरोना संक्रमित व्यक्तीच्या छातीत दुखत असल्यास, या लक्षणांकडे देखील लक्ष दिले पाहिजे.

कोरडा खोकला
कोरोनाच्या जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये रुग्णांना सुका खोकला हे सर्वसामान्य लक्षण मानलं जातं. खोकल्याची तिव्रता जास्त असेल तर व्यक्तीच्या छातीत दुखू लागते. याशिवाय व्यक्तीला छातीमध्ये प्रचंड वेदना आणि तिव्र खोकला श्वासोच्छवासाची समस्या वाढू शकते. त्यामुळे छातीच्या सभोवतालचे स्नायू फुटणे अशा समस्या उद्भवू शकतात.

कोविड न्यूमोनिया
कोविडच्या नवी लक्षणांमध्ये लोक न्यूमोनियाने देखील ग्रस्त आहेत, अशा परिस्थितीत रुग्णाला अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. फुफ्फुसांच्या आतल्या हवेच्या पिशवीमध्ये जळजळ झाल्यानं न्यूमोनिया होतो. यामुळे छातीत द्रव तयार होतो आणि लक्षणे तीव्र होऊ शकतात. या स्थितीत लोकांना रात्री छातीत दुखण्याच्या समस्या जास्त असते.

फुफ्फुसांचे संक्रमण
संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, फुफ्फुसातील संसर्गाचे प्रमाण जास्त दिसून येते. जर फुफ्फुसात थोडी सूज येत असेल तर रुग्णाला छातीत अस्वस्थता आणि वेदनांच्या समस्या येऊ शकतात. अशा परिस्थितीत, फुफ्फुसांची स्थिती जाणून घेण्यासाठी छातीचा एक्स-रे किंवा सीटी-स्कॅन करणे चांगले ठरते.