Corona Tablet Vaccine | इंजेक्शन ऐवजी टॅबलेटने व्हॅक्सीन देण्याची तयारी, ठरणार का गेम चेंजर?

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांना इंजेक्शनद्वारे व्हॅक्सीन दिली जात आहे. परंतु भविष्यात टॅबलेट (Corona Tablet vaccine) आणि इन्हेलरच्या रूपात (Corona Inhaler vaccine) सुद्धा लोकांना व्हॅक्सीन मिळू शकते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, स्वीडनच्या सर्वात मोठ्या सायन्स पार्कने इन्जेमो अँडरसन यांच्या नेतृत्वात यावर काम करण्यास सुरूवात (Tablet) केली आहे. ते प्लॅस्टिकचे एक असे इन्हेलर बनवत आहेत ज्याचा आकार मॅचिसच्या पेटीपेक्षा निम्मा आहे.

अँडरसन आणि त्यांच्या टीमला आशा आहे की, हा छोटा इन्हेलर कोरोनाच्या लढाईत संपूर्ण जगासाठी एक मजबूत शस्त्र म्हणून काम करेल. या इन्हेलरद्वारे लोक व्हॅक्सीन एका पावडर व्हर्जनमध्ये घरी आणू शकतात. फर्मचे सीईओ जोहन वोबोर्ग यांनी सांगितले की, हे सर्वात स्वस्त आणि सहज प्रोड्यूस होणारे तंत्रज्ञान आहे, ज्याचा वापर सामान्यपणे अस्थमाचे रूग्ण करतात.

Jalgaon Crime | जळगावमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार; प्रचंड खळबळ

Corona Tablet Vaccine | covid vaccine be taken as a pill or nasal spray says scientist

त्यांनी म्हटले, तुम्ही केवळ त्यावर लावलेली एक छोटी प्लास्टिक स्लिप हटवा आणि हे इन्हेलर अ‍ॅक्टिव्ह होईल. यानंतर ते तोंडाला लावा आणि श्वास घ्या. ही इन्हेलर व्हॅक्सीन (Corona Inhaler vaccine) नाकापासून फुफ्फुसापर्यंत आपला परिणाम दाखवेल.

Iconovo नावाच्या कंपनीने स्टॉकहोममध्ये एक इम्यूनोलॉजी रिसर्च स्टार्टअप ISR च्या सोबत एक करार केला आहे, ज्यांनी कोविड-19 विरूद्घ ड्राय-पावडर व्हॅक्सीन विकसित केली आहे. यात कोविड-19 च्या व्हायरस प्रोटीन्सचा वापर केला जातो. (फायजर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेका सारख्या व्हॅक्सीन RNA किंवा DNA चा वापर करता जो या प्रोटीन्ससाठी कोड आहे).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ही व्हॅक्सीन 40 डिग्री तापमानात सुद्धा ठेवता येऊ शकते. मात्र, डब्ल्यूएचओद्वारे अप्रूव्ह कोणतीही
लिक्विड फॉर्म व्हॅक्सीन स्टोअर करून ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. ती फ्रिजपर्यंत
पोहचण्यापूर्वी काचेच्या एखाद्या मजबूत जारमध्ये -70 डिग्री सेल्सियसच्या तापमानात ठेवावी लागते.
असे न झाल्यास या व्हॅक्सीनचा प्रभाव कमी होतो.

ISR चे फाऊंडर आणि कोरोलिंका इन्स्टीट्यूटमध्ये इम्यूनोलॉजीचे प्रोफेसर ओला विंकिस्ट म्हणतात की, कोल्ड चेनच्या मदतीशिवाय व्हॅक्सीनचे सोप्या पद्धतीने वितरण मोठे गेमचेंजर ठरू शकते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही (Corona Tablet vaccine) हेल्थकेयर प्रोव्हायडर्सच्या मदतीशिवाय लोकांना देता येऊ शकते. ही व्हॅक्सीन एखाद्या टॅबलेटप्रमाणे असू शकते.

हे देखील वाचा

Crime News | प्रेमप्रकरणातून 17 वर्षीय मुलाचं गुप्तांग कापूण केलं ठार; प्रियसीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

Yashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


Web Titel :  Corona Tablet Vaccine | covid vaccine be taken as a pill or nasal spray says scientist