Corona Test And Treatment | बिनकामाच्या टेस्ट अन् उपचार पध्दतीसंदर्भात देशातील 35 डॉक्टरांचे राज्य-केंद्र सरकारला पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Corona Test And Treatment | कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भरमसाठ चाचण्या (Corona Test) आणि त्याची अवाजवी बिले यामुळे सर्वसामान्य लोक मेटाकुटीला आले होते. सरकारने चाचण्यांसाठी दर निश्चित केले तरी वेगवेगळ्या पद्धतीने लूट सुरूच होती. आता तिसऱ्या लाटेतही तोच प्रकार सुरु आहे. आधीच रूग्ण खचलेला असतो त्यातच बिनकामाच्या चाचण्या (Unnecessary Tests) आणि अनावश्यक उपचार पद्धतीने (Unnecessary Treatment) रुग्णासह नातेवाईकांवर मानसिक ताण निर्माण होत असल्याचा दावा देशातील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. या अनावश्यक उपचारपद्धती आणि चाचणीचा वापर केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांनी थांबवले पाहिजे. यासाठी विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ३५ डॉक्टरांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. (Corona Test And Treatment)

 

ज्या डॉक्टरांनी पत्र पाठवले त्यातीलच एक असणारे डॉ. संजय नागराल म्हणाले की, सध्या देशात कोरोना उपचार, चाचणी आणि रुग्णालयात भरती करणे यावर अनावश्यक भर दिला जात आहे. हि परिस्थिती सरकार पर्यंत पोहिचवण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रावर अमेरिकेतील हार्वर्ड (Howard University) आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील (John Haffkine University) भारतीय वंशाच्या काही डॉक्टरांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे २०२१ मध्ये झालेल्या काही चुकांची पुनरावृत्ती पुन्हा २०२२ मध्ये होत असल्याचे या पत्रात म्हंटले आहे. यामध्ये प्रमुख तीन समस्या मांडण्यात आल्या आहेत. अवास्तव औषधोपचार, अवाजवी चाचण्या आणि आवश्यकता नसतानाही रुग्णालयात भरती करणे, ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. काही रुग्णांना तर औषधांचीही आवश्यकता नाही किंवा त्यांना किरकोळ औषधोपचारानंतर रुग्ण बरे होत आहेत, असे डॉक्टरांनी या पत्रात म्हंटले आहे. (Corona Test And Treatment)

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधांचा अतिवापर झाला त्यामुळे म्युकरमायकोसीसचा उद्रेक झाला.
बहुसंख्य रुग्णांची आधी रॅपिड अँटिजन टेस्ट (Rapid Antigen Test) , आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करणे गरजेचे आहे.
यानंतर, संबंधित रुग्णांना फक्त विलगीकरण ठेवले, तरी पुरेसे आहे.
पण, अशा रुग्णांनाही सीटी स्कॅन (CT Scan), तसेच महागड्या रक्तचाचण्या (Blood Test) करण्याचा सल्ला दिला जातो.
गरज नसताना त्यांना रुग्णालयात भरती केले जात आहे.
त्यामुळे कुटूंबावरील आर्थिक बोजा वाढत असून मानसिक ताण येऊ लागला आहे. असेही या पत्रात म्हंटले आहे.

 

Web Title :- Corona Test And Treatment | stop unnecessary tests and treatments 35 doctors writes state and central government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा