पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, आता अर्ध्या तासात होणार ‘कोरोना’ टेस्ट, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिके मार्फत आयसीएमआर मान्यता प्राप्त एक लाख लॅपिड अँटिजेन टेस्ट किट खरेदी केले आहेत. हे सर्व किट पुण्यात दाखल झाले असून यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे किंवा नाही, याचे निदान केवळ अर्ध्या तासात होणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मुलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुणे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. स्थायी समिती मार्फत एक लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या किटची किंमत 450 रुपये असून एखादा व्यक्ती बाधित असल्यास, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तिच्या तपासण्या करण्यास अधिक फायदेशीर ठरणार आहे.

याआधी एखाद्याचे रिपोर्ट येण्यास साधारणपणे दोन दिवसांचा कालावधी लागत होता. आता या किटच्या माध्यमातुन केवळ अर्ध्या तासात रिपोर्ट मिळणार आहे. यामुळे बाधित रुग्णावर तातडीने उपचार होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयामध्ये देखील, या किटचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like