शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक ! वर्गात ‘या’ 3 विषयांचे अध्यापन, इतर विषय ऑनलाइन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सोमवार (ता. 23) पासून राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. या संबंधी मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शिक्षक व शिक्षकेतरांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. बुधवारी शिक्षण संचालकांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना वर्गातील उपस्थिती पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. कोरोना निगेटिव्ह असलेलेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहतील याची काळजी देखील घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. हे सारं असलं तरी प्रत्यक्ष वर्गात गणित विज्ञान आणि इंग्रजीचे अध्यापन सुरु होणार आहे. तर इतर विषय ऑनलाइन शिकवले जाणार आहे.

वर्गात गणित,विज्ञान, इंग्रजीच अध्यापन गरजेचं

ऑनलाईन पद्धतीनंकी प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करण्यास आपली पसंती आहे असं शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विचारले होते. उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे फारसे पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र पुढे आलं आहे. १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेलं तापमान, दिवाळीत झालेली गर्दी, फटाक्यांच्या आतषबाजीने वाढलेले प्रदूषणा या सगळ्यात आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे.

एका बाकावर एकच विद्यार्थी; नावानिशी होणार बैठक

आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये संपर्क साधल्यावर आयुक्त हिरालाल सोनवणे मंत्रालयात गेले असून प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या मार्गदर्शक सूचना आल्यावर आश्रम शाळा सुरू होण्याची बाब स्पष्ट होईल.असं सांगण्यात आलं. नववी ते बारावीचे वसतिगृह आणि आश्रम शाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वर्गाप्रमाणे शिक्षकांच्या खोलीमध्ये बैठक व व्यवस्थित शारीरिक अंतरा ठेवायचे आहे. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानेच व्यवस्था करायची आहे.

घरीच अभ्यास करा

पिण्याचे पाणी, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी शारीरिक अंतर राखले जावं म्हणून चौकोन, वर्तुळ आखायचे . गर्दीसाठी स्नेहसंमेलन खेळ व इतर कार्यक्रम घेता येणार नाहीत. पालकांच्या बैठकी ऑनलाइन घ्यायच्या. एकाच दिवशी५० टक्के विद्यार्थी शाळेत आणि ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण कसे घेतील याची व्यवस्था शाळांनी करायची आहे. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी तीन ते चार तासअसेल. वर्गात जेवणाची सुट्टी नसेल. विद्यार्थ्यांना पालकांच्या वतीने घरी राहून अभ्यास करता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनासाठी विशिष्ट योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदवर राहील.

शाळेत शिक्षण घेण्याबद्दलच्या काही सूचना

– शाळेत हात धुण्याची सवय उपलब्ध करणे.

– जंतुनाशक पाणी, साबण, थर्मामीटर, थर्मल स्कॅनर-गन, पक्ष आॅक्सिमीटर उपलब्धता करणे. शाळेची स्वच्छता निवृत्ती निर्जंतुकीकरणची स्थानिक प्रशासनावर जबाबदारी.

– एखाद्या शाळेत क्वारंटाइन सेंटर असल्यास ते हलविणे शक्‍य नसल्यास खुल्या परिसरातल्या इतर ठिकाणी शाळा भरविणे.

– नवीन विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्ण उपस्थितीसाठीची पारितोषिके बंद करणे.

– विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी शाळेत असेपर्यंत मास्क वापरणे. मास्क अदलाबदल होणार नाही याची दक्षता घेणं .

– प्रत्येकाची रोज साधी आरोग्य चाचण्या घेणे.

– पालकांनी शक्यतो स्वतःच्या वाहनाने विद्यार्थ्यांना शाळेत सोडावं.

– विद्यार्थ्यांनी स्वतःबाटली पाणी आणावी.

– शाळांच्या वाहनांचे दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करणं.
शाळेच्या परिसरात चारपेक्षा अधिक विद्यार्थी जमणार नाही याची मुख्याध्यापकांची जबाबदारी असेल.

– पुस्तके वही पेन पेन्सिल वॉटर बॉटल आधी साहित्यांची विद्यार्थ्यांकडून अदलाबदल होऊ नये.

– अध्यापन साहित्य टॅबलेट, खुर्च्या आदींचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावं.

– शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यावर शाळा वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करावं.

– शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर या व्यतिरिक्त इतरांना शाळा आवारात व प्रवेशद्वारावर प्रवेश नसावा.

२२ नोव्हेंबरपर्यंत नववी ते बारावीच्या शिक्षक शिक्षकेतरांच्या कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सर्व ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना देण्यात आली आहे. रुग्णालयात जाऊन चाचणी करून घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याविषयी गटशिक्षणाधिकारी, नाशिक आणि मालेगाव महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी यांना कळविण्यात आलं आहे. शिक्षकांची एकाच दिवशी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. शारीरिक अंतर राखावं.

लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक