Corona Third wave In India | इतर देशातील वाढत्या कोरोना बाधितांच्या आकड्यामुळे भारताला जास्त धोका, 13 राज्यात रुग्णांचा आकडा अधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Corona Third wave In India | जगात कोरोनाच्या (Corona Virus) दुस-या लाटेनं थैमान घातलं आहे. या भयंकर लाटेनं लोकांना हतबल करून टाकलं आहे. कोरोना विषाणुच्या संकटामुळे प्रत्येक राज्यातील राज्य सरकारने (State Government) राज्यात कडक निर्बंध देखील लावले होते. सध्याही काही प्रमाणात निर्बंध लागू आहेत. मुख्यतः म्हणजे सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) सुरु असतानाच आता आणखी बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. यावरून आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव येईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्रिटन, अमेरिका तसेच रशिया या देशासह आणखी काही बड्या देशात कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. यावरून आता भारताला (India) धोका निर्माण झाला आहे. (Corona Third wave In India)

Corona Third wave In India | third wave of corona in india increased risk of infection in 13 states

कोरोना बाधितांची संख्या चाळीस हजारांच्या आसपास असणं ही एक धोक्याची घंटा असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे ज्या पद्धतीने स्थिर झालेत. ते बघितल्यानंतर लवकरच हा आकडा वाढला जाण्याचा अंदाज आहे. यंदाच्या कोरोनाच्या लाटेनंतर झालेल्या सेरो सर्वेक्षणात (Sero survey) देशातील 68 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज (Antibodies) आढळले आहेत. यात ज्यांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) देण्यात आलीय. त्यांचाही समावेश आहे. तसेच, देशातील 13 राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा शिवाय ईशान्येकडील काही राज्यात बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

यंदाच्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर व्यक्तीमध्ये अँटीबॉडीज (Antibodies) (प्रतिपिंडे) तयार
झालीत. म्हणून कोरोनाची तिसरी लाट पहिल्यासारखी भयानक ठरणार नाही. हे नक्कीच आहे की,
कोरोनाची प्रकरणे ज्या वेगानं कमी होत होती त्यात आता स्थिरता आली आहे. म्हणून हे आता
तिसऱ्या लाटेकडे निर्देशित करत आहे. अनेक देशात अशीच परिस्थिती दिसून आलीय. असं वर्धमान
महावीर मेडिकल कॉलेजचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे संचालक प्रोफेसर जुगल किशोर सांगितलं आहे. या दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) आकडेवारीनुसार केरळ, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि ईशान्येकडील 8 राज्यांसह एकूण तेरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची नोंद केली आहे.

हे देखील वाचा

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी घेतली पंकजा मुंडेंची भेट; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा

Heavy Rain | कोयना, उरमोडी धरणातून नदीत पाणी सोडणार; कोयना धरणात गेल्या 12 तासात साडेसहा TMC पाणीसाठा वाढला

Cloudburst in Tamhini | ‘ताम्हिणी’त 24 तासात 486 मिमी पावसाची नोंद; पानशेत, टेमघर परिसरात मुसळधार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Corona Third wave In India | third wave of corona in india increased risk of infection in 13 states

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update