कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave)
ओसरत असतानाच आता पुन्हा एकदा संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे.  गेल्या २४ तासात ४२ हजाराहून अधिक बाधित आढळून आले आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचे (Corona Third wave) संकेत दिले आहे. बाधितांची संख्या कमी झाल्याने अनेक राज्यांनी

जळगाव जिल्ह्यातील जवान लेह लडाखमध्ये शहीद

लॉकडाउन आणि निर्बंध शिथिल केले आहेत. लोक घराबाहेर पडल्याने गर्दी वाढू लागली असून,
कोरोना विषयक नियमांकडेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. दुसरीकडे लसीकरणही (Vaccination)
आवश्यक तेवढे होत नाही. त्यामुळे  लॉकडाउन, निर्बंध शिथिल करण्याबरोबरच लसीकरणाचा वेग कमी असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना थांबला आहे, असे आताच म्हणता येणार नसल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Scientist Soumya Swaminathan) यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन आहे. त्याला वैतागून लोक बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे नियमांचे  पालन होताना दिसत नाही. हे वर्तनच तिसऱ्या लाटेला कारणीभूत होऊ शकते लसीकरणामुळे काही देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर काही देशांत ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रुग्णसंख्याही कमी झालेली नाही. त्यामुळे कोरोना थांबलेला नाही, असा इशारा स्वामीनाथन यांनी दिला आहे.

कोरोनाचे बदललेले रूप म्हणजे डेल्टा हा सर्वात गंभीर आहे. दुसऱ्या लाटेला तोच कारणीभूत आहे.
मूळ विषाणूमुळे संसर्ग झालेली व्यक्ती तिघांना बाधित करीत असेल, तर डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग
झालेली व्यक्ती आठ जणांना बाधित करते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. या प्रकारामुळे
भारतात दुसरी लाट आली आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील स्थिती चिंताजनक
महाराष्ट्रासह तीन राज्यांत डेल्टा प्लस हा विषाणूचा प्रकार आढळला आहे. त्याच्या बाधितांची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे. आता महाराष्ट्रात कोरोना निर्बंध देखील शिथिल झाल्याने रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. सातारासह काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे.  त्यामुळे वेळीच खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : third wave knocking indias covid 19 case trajectory shows worrying trend in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update