Corona Third Wave : नीती आयोगने म्हटले – ‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, तयार राहण्याची आवश्यकता’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – V. K. Saraswat. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत  यांनी म्हटले भारताने कोविड-19 च्या लाटेचा सामना खुप चांगल्याप्रकारे केला आणि यासाठी संसर्गाची नवीन प्रकरणे कमी झाली आहेत. सोबतच त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की, तिसर्‍या लाटे (Corona Third Wave) चा सामना करण्यासाठी सुद्धा तयारी पूर्ण झाली पाहिजे, तिसर्‍या लाटे (Corona Third Wave) मुळे लहान मुले आणि तरूण लोकसंख्येला धोका आहे असे  व्ही. के. सारस्वत ( V. K. Saraswat. ) यांनी म्हटले.

तिसर्‍या लाटेचे स्पष्ट संकेत
सारस्वत म्हणाले, भारतातील महामारी तज्ज्ञांनी खुपच स्पष्ट संकेत दिले आहेत.
कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेची शक्यता आहे आणि ती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी देशाने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले पाहिजे.

दुसर्‍या लाटेचा सामना चांगला केला
सारस्वत यांनी म्हटले की, मला वाटते आम्ही खुप चांगले काम केले आहे.
आम्ही कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेचा सामना चांगल्या प्रकारे केला आणि त्याच्याच परिणाम म्हणून संसार्गाची प्रकरणे खुप कमी होत आहेत.
आमच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान व्यवस्थेची मदत, ऑक्सीजन बँक बनवणे, मोठ्या संख्ये ऑक्सीजन पुरवठ्यासाठ उद्योग स्थापन करणे, आम्ही महामारीला तोंड देण्यात यशस्वी ठरलो.
रेल्वे, विमानतळ, सैन्य दलाचा वापर द्रव ऑक्सीजन आणण्यासाठी केला जात आहे.

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

तिसर्‍या लाटेपूर्वी खुशखबर ! देशात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याचे वृत्त असतानाच एक चांगली बातमी आहे. मुलांसाठी सुद्धा लवकरच व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकते. केंद्र सरकारने शुक्रवारी संकेत दिले आहेत की, मुलांसाठी कोरोनाची लस याच महिन्यात येऊ शकते. सरकारनुसार, जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनला लवकरच मंजूरी दिली जाऊ शकते, या लसीची चाचणी 12-18 वर्ष वयाच्या मुलांवर सुद्धा झाली आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, सध्या कोव्हॅक्सीनची मुलांवर चाचणी सुरू आहे, परंतु ती पूर्ण होण्यास जास्त वेळ लागणार नाही, कारण चाचणी प्रतिकारशक्तीची होते. तर जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनची चाचणी मुलांवर झाली आहे. आशा आहे की, पुढील दोन आठवड्या ती लायसन्ससाठी येऊ शकते.

Click to read more details