Corona third wave | तिसऱ्या लाटेत कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखाच्या घरात जाण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या आठ लाख तर संसर्गग्रस्त मुलांची संख्या १० टक्क्यांपर्यंत असू शकते, असे आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray,) यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील सादरीकरणात सांगितले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली असल्याचेही या सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले. Corona third wave | shocking possibility active patients reach eight lakhs third wave maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ब्रिटन तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे.
दुसऱ्या लाटे इतकाच फक्त एका आठवड्यातच या लाटेचा प्रादुर्भाव झाला आहे.
योग्य खबरदारी न घेतल्यास आपल्यालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल, असे महाराष्ट्र टास्क फोर्सचे (Maharashtra Task Force) सदस्य असलेले डॉ. शंशाक जोशी यांनी म्हंटले आहे.
संसर्गजन्य रोगांवरील शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, साधारण १०० दिवस ते आठ आठवड्यांत या लाटेचे पीक येऊ शकते.
तसेच या लाटेत लहान मुलांना अधिक धोका नसेल.
यापूर्वी आलेल्या दोन लाटांमध्ये जेवढी रुग्ण संख्या होती त्याचप्रमाणात म्हणजे ३.५ टक्क्यांपेक्षा अधिक नसेल.

‘लसीकरणावर (Vaccination) भर द्या’

राज्य सरकारने काही दिवसांपासून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे.
औषधांचा साठा शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आहे की नाही ते पाहावे, अशी सूचना दिली आहे.
सोबतच टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही बैठक पार पडली आहे.
टास्क फोर्सच्या डॉक्टरांना सिरो सर्व्हे करण्यासह मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पडण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

राज्यात दोन कोटी ६७ लाख लाभार्थ्यांना लस

मुंबई : दोन कोटी ६७ लाख २० हजार १७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असून दिवसभरात दोन लाख ३४ हजार ३५८ जणांना लस देण्यात आली.
असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने (Department of Health) सांगितले.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील २६ लाख ९४ हजार ७३० लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस २ लाख ११ हजार ४०९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

Web Title : Corona third wave | shocking possibility active patients reach eight lakhs third wave maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vaccination registration | मुंबईसह काही जिल्ह्यात लवकरच साप्ताहिक लसीकरण नोंदणी, ठाकरे सरकारची न्यायालयात ग्वाही