‘या’ किरणांच्या मदतीनं रक्तातून ‘नष्ट’ होणार ‘कोरोना’, वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या उपचारासंबंधित एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संशोधकांनी एका अभ्यासाद्वारे हे दाखविले आहे की, कोरोना व्हायरसला विटॅमिन रिबोफ्लेविन आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या संपर्कात आणले तर हा मानव प्लाझ्मा आणि रेड ब्लड सेलमध्ये व्हायरसला कमी करतो. ही एक अशी उपलब्धी आहे ज्याने ब्लड शरीरात ट्रांन्सफर करताना व्हायरसच्या प्रसाराला कमी करण्यासाठी मदत मिळते.

अमेरिकेच्या कोलोराडो स्टेट यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, आता हे समजू शकले नाही की, कोविड 19 जागतिक महामारीसाठी जबाबदार कोरोना व्हायरस सार्स किंवा कोविड 19 ब्लड ट्रान्सफर केल्याने पसरतो की नाही. अभ्यासामध्ये वैज्ञानिकांनी प्लाझ्माच्या नऊ आणि तीन रक्तांच्या उत्पादनांच्या उपचारासाठी मिरासोल पैथोजन रिडक्शन टेक्नॉलॉजी सिस्टम नावाचे एक उपकरण विकसित केले आहे. अभ्यासक सह-लेखिका इजाबेला रगान यांनी सांगितले की, ‘आम्ही व्हायरसच्या प्रसाराला घटवले आणि उपाचारानंतर आम्हाला व्हायरस आढळला नाही.’

सीएसयू स्टडीचे वरीष्ठ लेखक रे गुडरिचद्वारे हे उपकरण रक्त उत्पादन किंवा प्लाझ्माला अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या संपर्कांत आणण्याचे काम करतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे उपकरण 1980 च्या दशकात त्यावेळी बनले जेव्हा एचआयव्ही ब्लड आणि रक्त उत्पादनाद्वारे पसरला होता. ते म्हणाले की, सध्या मिरासोलचा उपयोग फक्त अमेरिकेच्या बाहेर खास यूरोप, पश्चिम आशिया आणि अफ्रिकामध्ये स्वीकृत आहे. हा अभ्यास ‘पीएलओएस वन’ पत्रिकेमध्ये प्रकाशिक झाला आहे.