प्रसिध्द अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मोठया मुलाला कोरोनाची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेता सुबोध भावे याला कुटुंबीयांसह कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सुबोधची पत्नी आणि मोठ्या मुलासह त्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या सुबोध पत्नी आणि मलासह घरातच क्वारंटाईनआहे. खुद्द सुबोधनंच ट्विट कतर या संदर्भात माहिती दिली आहे.

सुबोधनं सांगितलं की, “मी, मंजिरी (पत्नी) आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरातच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे.”

https://twitter.com/subodhbhave/status/1300342083169837057

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या. सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया असंही सुबोधनं आपल्या ट्विमधून सांगितलं आहे.