Pune : दुर्देवी ! बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही कोरोनाने मृत्यू

पुणे / आंबेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची Corona दुसरी लाट अत्यंत घातक आहे. अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहे. अनेकांनी आपली जीवाभावाची माणसं गमावली आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना अवसरीत घडली आहे. शनिवारी बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचा कोरोनाने Corona मृत्यू झाला आहे. माधवी बाळासाहेब हिंगे पाटील (वय ३१) व भाऊ मयूर बाळासाहेब हिंगे पाटील (वय २९) नावे आहेत. या घटनेमुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधवी हिंगे पाटील यांचे डीएड पर्यंत शिक्षण झाले असून तिने ज्योतिष शास्त्र अंक शास्त्राची पदवी घेतली आहे तर मयूर हा संगणक इंजिनीयर झाला आहे.

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

पंधरा दिवसापूर्वी हिंगे कुटुबातील सर्वाना कोरोनाची लागण झाली होती. आई-वडील व्यवस्थित कोरोनातून बरे झाले, माधवी व मयूर यांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार चालू असतानाच माधवीचे निधन झाले. मुलीच्या विरहाचे अश्रू अजून पुसलेही नव्हते, तोपर्यंत हिंगे कुटुंबीयांवर कोरोना विषाणूने दुसरा घात केला. माधवी हीचा दशक्रिया विधी असतानाच ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं मयूरच निधन झालं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या