शास्त्रज्ञांचा दावा – Molnupiravir ने 24 तासात बरे होतील Covid-19 चे रूग्ण

न्यूयॉर्क : कोविड-19 महामारीला आता एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, परंतु अजूनपर्यंत यावर अचूक औषध तयार झालेले नाही. जगभरात कोरोना व्हॅक्सीन बनवण्याच्या प्रयत्नांनी वेग घेतला आहे, तर दुसरीकडे शास्त्रज्ञांनी असे औषध शोधून काढले आहे जे केवळ 24 तासात कोरोनाचा उपचार करू शकते. या दरम्यान, शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, हे अँटी व्हायरल ड्रग कोरोनाला पूर्णपणे नष्ट करू शकते. या औषधाचे नाव MK-4482/EIDD-2801 आहे. यास सोप्या भाषेत मोल्नूपीराविर सुद्धा म्हटले जाते.

कोरोनाच्या उपचारात गेम चेंजर ठरणार मोल्नूपीराविर
जर्नल ऑफ नेचर मायक्रोबायलॉजीमध्ये प्रसिद्ध एका स्टडीनुसार, मोल्नूपीराविरने कोरोनाच्या रूग्णांना संसर्ग पसरवण्यापासून रोखले जाऊ शकते तसेच पुढे होणार्‍या गंभीर परिणामांपासून सुद्धा वाचवले जाऊ शकते. या स्टडीचे लेखक चर्ड प्लेंपर यांचे म्हणणे आहे की, हे पहिल्यांदा होत आहे जेव्हा कोरोनाच्या उपचारात तोंडावाटे खाल्ले जाणारे औषध सादर केले जात आहे. MK-4482/EIDD-2801 कोरोनाच्या उपचारात गेम चेंजर सिद्धा होऊ शकते.

इन्फ्लुएंझा सुद्धा नष्ट करण्यात परिणामकारक
या औषधाचा शोध जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्च टीमने लावला आहे. सुरूवातीच्या शोधात हे औषध इन्फ्लुएंझा सारखा जीवघेणा फ्लू नष्ट करण्यात परिणामकारक आढळले, ज्यानंतर फेरेट मॉडलद्वारे यावर सार्स-कोव्ह-2 च्या संसर्गाला रोखण्यासाठी संशोधन करण्यात आले. हे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रथम काही जनावरांना कोरोना व्हायरसने संक्रमित केले. जेव्हा या जनावरांच्या नाकातून व्हायरस सोडण्यास सुरूवात केली, त्यांना मोल्नूपीराविर देण्यात आले. यानंतर या संक्रमित जनावरांना निरोगी जनावरांच्या सोबत एकाच पिंजर्‍यात ठेवण्यात आले.

24 तासात बरे होतील रूग्ण
रिसर्चचे सह लेखक जोसफ वॉल्फ यांच्यानुसार, संक्रमित जनावरांसोबत ठेवलेल्या निरोगी जनावरांपैकी कुणालाही संसर्ग झाला नाही. जर अशाच प्रकारे कोरोना संक्रमित रूग्णांवर मोल्नूपीराविर ड्रगचा वापर केला गेला, तर 24 तासात रूग्ण बरे होतील.