अभिनेत्री कंगना रणौतही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. तसेच बॉलिवूड क्षेत्रात सुद्धा कोरोनाने घर केलं आहे. तर कायम सोशल मीडियावर अनेक गोष्टीवर प्रतिक्रिया देणारी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः कंगनाने दिली आहे.

काही दिवसापूर्वी कंगना रणौतचे ट्विटर खाते सस्पेंड करण्यात आल्याने तिने कोरोना अहवाल सकारात्मक आल्याची माहिती इंन्स्टाग्रामवरून दिली आहे. त्यावेळी कंगनाने पोस्ट करताना म्हटली आहे की, मागील काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी कोव्हीड टेस्ट केली आणि आज मी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

या दरम्यान, माहिती देताना तिने म्हटले की, मला काही कल्पनाच नाही आहे की हा विषाणू माझ्या शरिरात पार्टी करत आहे, आता मला एवढं माहिते की मी त्याला संपवेन, कोणत्याही शक्तिला तुमच्यापेक्षा वरचढ होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल. केवळ एक ठराविक काळासाठी आलेला ताप आहे ज्याला अधिक प्रसिद्धी मिळाली आणि काही लोकांना तो मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव’. असे कंगनाने पोस्ट करताना म्हटली आहे.