दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगालचा प्रवास करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मुंबई : कोरोना संकटादरम्यान प्रत्येक राज्यांनी प्रवाशांसाठी विविध प्रकारची मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. परंतु, प्रवासादरम्यान कोरोना टेस्टबाबत अजूनही लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. काही राज्यांमध्ये विशेष प्रकारे काही अनिवार्य नियम लागू आहेत, ज्यांचे प्रत्येक प्रवाशाला पालन करावे लागेल. कोणत्या राज्यासाठी कोणते नियम आहेत ते जाणून घेवूयात…

दिल्ली
आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रातून दिल्लीत येणार्‍या प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. दिल्लीत हा नियम 27 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत लागू आहे. प्रवाशांना हे लक्षात ठेवावे लागेल की, त्यांचा कोरोना रिपोर्ट 72 तासांपेक्षा जास्त जुना असू नये. विशेष बाब ही आहे की, केवळ आयसीएमआरद्वारे मंजूर लॅबमधूनच चाचणी करावी लागेल.

महाराष्ट्र
सर्व प्रवाशांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. दिल्ली-एनसीआर, केरळ, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून येणार्‍या प्रवाशांना आरटी-पीसीआर रिपोर्ट आणावा लागेल, जो लँडिंगच्या निर्धारित वेळेपेक्षा 72 तासांपूर्वी केलेला नसावा.

कर्नाटक
सर्व प्रवाशांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करावे. केरळ आणि महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांसाठी हे अनिवार्य आहे की, त्यांनी आयसीएमआरद्वारे निर्देशित लॅबमधून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन यावे. हा रिपोर्ट कर्नाटक राज्यात येण्याच्या 72 तासांपूर्वीचा नसावा.

पश्चिम बंगाल
27 फेब्रुवारी 2021 ला दुपारी 12:00 वाजल्यानंतर महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि तेलंगना राज्यांतून पश्चिम बंगालला पोहचणार्‍या सर्व प्रवाशांसाठी हे अनिवार्य आहे की, त्यांनी आपला निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट घेऊन यावे. हा रिपोर्ट प्रस्थानाच्या 72 तासांच्या आतील असावा. पश्चिम बंगाल सरकारचे संधाणे अ‍ॅप डाऊनलोड करावे आणि घोषणा पत्र भरणे सर्व प्रवाशांना अनिवार्य आहे.