COVID-19 : धक्कादायक ! ‘कोरोना’चे 85 % अ‍ॅक्टीव्ह प्रकरणं आणि 87 % मृत्यू ‘या’ 8 राज्यांमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशभरात कोविड-19 ची 85.5 टक्के सक्रिय प्रकरणे आणि 87 टक्के मृत्यू महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि तमिळनाडुसह आठ राज्यातून आहेत. मंत्रालयाने शनिवारी कोविड-19 वर मंत्रीगटाला (जीओएम) या आकड्यांसह देशात महामारीची स्थिती आणि त्यास तोंड देण्यासाठी सुरू असलेली तयारी, याबाबत माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जीओएमला दिली माहिती
मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले आहे की, सध्या आठ राज्य – महाराष्ट्र, तमिळनाडु, दिल्ली, तेलंगना, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून एकुण सक्रिय रूग्णांचा 85.5 टक्के सहभाग आहे. तर देशात महामारीमुळे होणारे 87 टक्के मृत्यू सुद्धा याच राज्यात नोंदले गेले आहेत. देशात आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त संक्रमित प्रकरणे समोर आली आहेत आणि 15 हजारपेक्षा रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन जीओएम बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीनंतर हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशात रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढून 58 टक्के झाले आहे. तर, मृत्युदर तीन टक्केपेक्षा सुद्धा कमी आहे. आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ज्या लोकांवर उपचार सुरू आहे त्यांची स्थिती वेगाने सुधारत आहे. लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठवले जाईल, अशी अपेक्षा आहे. जीओएमच्या 17व्या बैठकीदरम्यान मंत्रालयाने सांगितले की, संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा दर 19 दिवस झाला आहे. लॉकडाऊनच्या अगोदर तीन दिवसात प्रकरणे दुप्पट होत होती.

आरोग्य मंत्रालयाने मंत्रीगटाला सांगितले की, जन आरोग्य तज्ज्ञ, महामारी तज्ज्ञ आणि संयुक्त सचिव स्तरावरील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या 15 केंद्रीय दलांना राज्यांच्या मदतीसाठी तैनात केले आहे. केंद्राचे एक दल सध्या गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगनाचा दौरा करून तेथे कोविड-19 व्यवस्थापनासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न मजबूत करत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) चे महासंचालक बलराम भार्गव यांनी तपासणीच्या रणनितीवर सविस्तर माहिती दिली. त्यांनी सिरो सर्वे आणि विविध तपासण्यांच्या माध्यमातून रोज करण्यात येणार्‍या तपासण्यांची क्षमता वाढवण्याबाबत माहिती दिली. भार्गव यांनी मंत्रीगटाला सांगितले की, भारतात आता कोविड-19 च्या तपासणीसाठी 1,026 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 741 सरकारी आणि 285 खासगी क्षेत्रातील आहेत.

1,039 कोविड समर्पित हॉस्पिटल
मंत्रालयाने म्हटले की, मंत्रीगटाला माहिती दिली की, 27 जूनपर्यंतच्या आकड्यांनुसार कोविड-संबंधी आरोग्य आधारभूत संरचना वाढवण्यात आली आहे आणि आता 1,039 समर्पित कोविड हॉस्पिटल आहेत, ज्यामध्ये 1,76,275 बेड, 22,940 आयसीयू बेड आणि 77,268 ऑक्सीजन सुविधा असणारे बेड आहेत. याशिवाय 2,398 समर्पित कोविड आरोग्य केंद्र आहेत, ज्यांच्यामध्ये 1,39,483 बेड, 11,539 आयसीयू बेड आणि 51,321 ऑक्सीजन सुविधायुक्त बेड आहेत.