एका आठवडयात 67 % वाढले कोरोनाचे रूग्ण, पॉझिटिव्हीटी रेट देखील थांबायचं नाव नाही घेत; तज्ज्ञ म्हणाले – ‘नवीन लाटेचा धोका सामने’

नवी दिल्ली : देशात लागोपाठ कोरोना प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्येच देशातील 80 टक्के नवी प्रकरणे नोंदली गेली आहेत. रविवारी महाराष्ट्रात 24 तासात 30 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. तर पंजाब, गुजरात, दिल्ली, यूपी आणि इतर अनेक राज्यांत सुद्धा स्थिती अनियंत्रित झाली आहे.

दिल्लीत मागील 24 तासात 823 नव्या केस नोंदल्या गेल्या. लागोपाठ दुसर्‍या दिवशी 800 पेक्षा जास्त केस सापडल्या. रिकव्हरी रेटमध्ये सुद्धा घसरण नोंदली गेली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे दिल्लीत 24 तासांच्या आत अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 200 पेक्षा जास्त वाढली आहे.

आणखा एका मोठ्या लाटेच्या तोंडावर देश
तज्ज्ञांनुसार, अलिकडेच संक्रमित होणार्‍या रूग्णांचा वयोगट (एज ग्रुप) जाणून घेणे खुपच महत्वाचे आहे. एक्सपर्टनुसार, जर कमी वयाचे लोक जास्त संक्रमित होत असतील तर नक्कीच आपण कोरोनाच्या आणखी एका मोठ्या लाटेच्या तोंडासमोर आहोत.

आतापर्यंत, 60 वर्षाच्यावरील लोकांमध्ये जास्त संसर्ग आढळून येत होता आणि 60 वर्षाच्या खालील लोकांमध्ये अतिशय कमी संसर्ग होता. परंतु जर हा आजार तरूण वर्गाकडे सरकत असेल तर आपल्याला सतर्क होण्यासह वेगाने याच्याविरूद्ध पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आकड्यांनुसार मागील एक आठवड्यात कोरोनाच्या प्रकरणात 67 टक्के वाढ झाली आहे.