CoroanaVirus : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, रुग्णांची संख्या 1453

औरंगाबाद : पोलीनामा ऑनलाइन – जिल्ह्यात शुक्रवारी (दि.29) सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. मागील सहा दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोना संख्येत घट पहायला मिळत होती. मात्र, मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाची समस्या वाढली आहे. गुरुवारी (दि.28) कोरोनाचे 45 रुग्ण वाढले असताना आज (शुक्रवारी सकाळी 46 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

औरंगाबादमध्ये 1453 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली असून 901 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्य़ंत 68 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर 484 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळवली आहे. दरम्यान, दोन दिवसात 91 रुग्णांची वाढ झाली आहे.

शुक्रवारी आढळलेले रुग्ण
नेहरूनगर 1, कटकट गेट 1, कैलासनगर माळी गल्ली 1, एन सहा सिडको 1, भूषण नगर, पहाडे कॉर्नर 1, श्रीनिकेतन कॉलनी 1, खडकेश्वर 1, उस्मानपुरा 1, कैलाश नगर 2, सातारा गाव 2, इटखेडा 3, उस्मानपुरा 3, जना बाजार 1, विश्रांती कॉलनी एन2 येथील 3, नारळी बाग गल्ली नं.2 येथील 1, राशेदपुरा, गणेश कॉलनी 1, शिवशंकर कॉलनी, गल्ली नं. 1 येथील 1, बायजीपुरा गल्ली नं. 2 येथील 1, एन 4 विवेकानंद नगर, सिडको 1, शिवाजीन नगर 1, एन 6 संभाजी कॉलनी 1, गजानन नगर एन 11 हडको 5, भवानी नगर जुना मोंढा 1, जुना बायजीपुरा 2, किराडपुरा 1, रोशनगेट 1, राशीदपुरा 1, मोतीवाला नगर 1, दौलताबाद 2, वाळूज सिडको 2, राम नगर कन्नड 2 याभागातील बाधीत आहेत. यात 14 महिला आणि 32 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.